पेडणे तालुक्यात राजकीय समीकरणांना वेग; गोवा फॉरवर्डला बसणार फटका

पेडणे मतदार संघातील गोवा फॉरवर्डचे उमेदवार जितेंद्र गावकर हे कॉंग्रेस पक्षात दोन दिवसात प्रवेश करीत असल्याने गोवा फॉरवर्डला पेडणे तून मोठा धक्का बसणार आहे.
Pernem : पेडणे मतदार संघातील गोवा फॉरवर्डचे उमेदवार जितेंद्र गावकर
Pernem : पेडणे मतदार संघातील गोवा फॉरवर्डचे उमेदवार जितेंद्र गावकर Dainik Gomantak

Morjim: विधानसभेच्या निवडणुकांना अजूनसहा महिन्यांचा काळ असला तरीही राजकीय पक्षाने आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरु केली आहे . गोवा फॉरवर्ड विजय ऑपरेशन 2 चे मांद्रे दीपक कलंगुटकर व पेडणे राखीव मतदार संघातून वकील जितेंद्र गावकर या स्थानिक युवकाला पक्षाचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांनी उमेदवारी जाहीर केली होती.

Pernem : पेडणे मतदार संघातील गोवा फॉरवर्डचे उमेदवार जितेंद्र गावकर
Lakhimpur Kheri Case: गोवा काँग्रेसच्या वतीने आझाद मैदानावर मूक आंदोलन

मात्र त्यातील पेडणे मतदार संघातील गोवा फॉरवर्डचे उमेदवार जितेंद्र गावकर हे कॉंग्रेस पक्षात दोन दिवसात प्रवेश करीत असल्याने गोवा फॉरवर्डला पेडणे तून मोठा धक्का बसणार आहे. आणि दुसर्‍या बाजूने कॉंग्रेसचे गोवा प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी हल्लीच कार्यकर्त्यांना पेडणेतून स्थानिक उमेदवाराला विजयी करा असे आवाहन केले होते, आणि त्याच पाश्वभूमीवर गावकर हे कॉंग्रेस प्रवेश करत असल्याने विठू मोरजकर यांना उमेदवारीपासून अडचणी निर्माण होणार आहेत.

Pernem : पेडणे मतदार संघातील गोवा फॉरवर्डचे उमेदवार जितेंद्र गावकर
गोव्यातील कदंब कर्मचारी संघटनेचा महामंडळाला इशारा

15 रोजी प्रवेश

वकील जितेंद्र गावकर यांचा कॉंग्रेस प्रवेश शुक्रवार दिनांक 15 रोजी सायंकाळी 5 वाजता पेडणे येथे होणार आहे. या प्रवेशाला विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, गोवा प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर उपस्थित राहणार आहे. अशी माहिती पेडणे गट कॉंग्रेस अध्यक्ष रुद्रेश देशप्रभू यांनी दिली. जितेंद्र गावकर यांच्याकडे संपर्क साधला असता लोकांचा आग्रह होता की मी काँग्रेस पक्षात जावे म्हणून,त्यांच्या अग्रहासाठी पक्षात जात असल्याचे त्यांनी सांगितले

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com