गोव्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ

राज्यात आतापर्यंत 1 लाख 89 हजार 909 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून यापैकी 1 लाख 77 हजार 168 रुग्ण बरे झाले आहेत.
Spike in COVID-19 cases in Goa
Spike in COVID-19 cases in GoaDainik Gomantak

पणजी: राज्यात वाढत असलेली कोरोनाबधितांची संख्या आणि ओमिक्रॉनच्या (Omicron variant) संसर्गाची भीती या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लागू केलेले कडक निर्बंध कायम असतानाही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नवे 1922 रुग्ण सापडले असून राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या नऊ हजारांच्या वर गेली आहे. (Spike in COVID-19 cases in Goa)

Spike in COVID-19 cases in Goa
गोव्यात निवडणूक आयोगाची 80 भरारी पथके सक्रिय

राज्यात आतापर्यंत 1 लाख 89 हजार 909 नागरिकांना कोरोनाची (Coronavirus) बाधा झाली असून यापैकी 1 लाख 77 हजार 168 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.29 टक्के इतके आहे. सध्या राज्यात तब्बल 9,202 रुग्ण (Patients) सक्रिय असून एकूण मृत्यूंचा आकडा 3 हजार 532 झाला आहे. रविवारी दिवसभर 7,761 संशयित रुग्णांच्या चाचण्या केल्या. त्यापैकी तब्बल 1,922 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com