Goa Cricket Association: पर्वरी मैदानावर फिरकी ‘दहशत’

दिवसभरात 20 विकेट: उदित, दर्शन, कीथ यांचा भेदक मारा
Goa Cricket Association Election
Goa Cricket Association ElectionDainik Gomantak

किशोर पेटकर

फिरकी गोलंदाजांच्या ‘दहशती’मुळे पर्वरी येथील जीसीए मैदानावर दिवसभरात दोन्ही संघांतील मिळून वीस गडी बाद झाले, मात्र दिवसअखेर एमसीसी संघाच्या सुमीरन आमोणकर (48) व प्रथमेश गावस (53) यांनी दुसऱ्या डावातील 22 षटकांत 102 धावांची अभेद्य सलामी दिल्यामुळे फिरकी भीती अनाठायी ठरली. आता त्यांच्यापाशी 26 धावांची आघाडी आहे.

जीसीए प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात बुधवारी एमसीसीचा डाव अवघ्या 86 धावांत आटोपला. जीनो क्लबचा ऑफब्रेक गोलंदाज उदित यादव (6-20) याने एमसीसीच्या फलंदाजांना सावरण्याची संधीच दिली नाही. याशिवाय अन्य फिरकी गोलंदाज धीरज यादव (2-31) व योगेश कवठणकर (1-4) यांनीही चांगला मारा केला. वेगवान समीत आर्यन मिश्रा (1-7) हा विकेट मिळणारा बिगरफिरकी गोलंदाज ठरला.

Goa Cricket Association Election
CM Pramod Sawant: लैंगिक अत्याचाराच्या कारणाविषयी मुख्यमंत्री स्पष्टच बोलले; वाचा सविस्तर...

नंतर एमसीसी संघाचा कर्णधार दर्शन मिसाळ (5-57) व कीथ पिंटो (5-59) या डावखुऱ्या फिरकीद्वयीने जीनोची स्थिती 9 बाद 134 अशी नाजूक केली. आनंद तेंडुलकर (40) व ईशान गडेकर (33) यांनी 73 धावांची सलामी देऊनही जीनो क्लबचा डाव गडगडला. वैभव नाईक (59) याच्या झुंजार अर्धशतकामुळे त्यांना 162 धावा करता आल्या व 76 धावांची आघाडीही मिळाली.

Goa Cricket Association Election
Goa Traffic Violation : वाहतूक पोलिसांची धडक कारवाई, महिन्याभरात 300 नोटीसा पाठवत वसूल केला 'इतक्या' लाखांचा दंड

चांगल्या सुरवातीनंतर साळगावकरचेही नुकसान

सांगे येथील जीसीए मैदानावर अमोघ देसाई (53) व दीपराज गावकर (67) यांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेली 91 धावांची भागीदारी, नंतर दीपराजने दिशांक मिस्कीन (41) याच्यासह केलेली पाचव्या विकेटसाठी केलेली 65 धावांची भागीदारी यामुळे धेंपो क्लबविरुद्ध साळगावकर क्लब घसरगुंडीपूर्वी 4 बाद 221 असा सुस्थितीत होता, मात्र 42 धावांत 5 विकेट गमावल्यामुळे त्यांचा डाव 9 बाद 263 असा कोसळला.

पहिल्या दिवसअखेर त्यांनी 9 बाद 291 धावा केल्या. याशिवाय आयुष वेर्लेकर (37) व यश कसवणकर (25) यांनीही फलंदाजीत योगदान दिले. धेंपोतर्फे लक्षय गर्ग (2-32), फरदीन खान (2-52) व विकास सिंग (3-96) हे गोलंदाज यशस्वी ठरले. दीप कसवणकर व रोहन बोगाटी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com