Mahadayi Water Dispute: म्हादईवरून ‘आरजी’मध्ये फूट!

गाभा समितीचे सदस्य आणि कार्यकर्त्यांचा राजीनामा
Mahadayi Water Dispute
Mahadayi Water DisputeDainik Gomantak

म्हादईच्या विषयावरून रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाने ‘एकला चलो रे’ ही भूमिका घेतल्याने पक्षांतर्गत नाराजीचे रूपांतर फुटीमध्ये झाले आहे. ‘आरजी’चे गाभा समितीचे काही सदस्य आणि विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांनी राजीनामा देत पक्षाला रामराम ठोकला.

म्हादईप्रश्‍नी ‘आरजी’ वगळता इतर विरोधी पक्ष एकसंघ झाले आहेत. परंतु ‘आरजी’मध्ये एकाधिकारशाही असून येथे एकाच माणसाची हुकूमत चालते. त्यामुळे आम्ही राजीनामा देऊन म्हादईच्या लढ्यात सहभागी होणार आहोत, असे ‘आरजी’चे गाभा समितीचे सदस्य गौरीश गावकर यांनी सांगितले. पणजी येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत वास्कोतील आंद्रे व्हिएगस, फोंड्यातील सनिश तिळवे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Mahadayi Water Dispute
Paragliding : जर्मनच्या पर्यटकावर थेट पॅराग्लायडर कोसळला अन् त्याने गमावली हाताची पाचही बोटे

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोमंतकीय लोक आंदोलन करणार नाहीत. कारण आम्ही त्याची व्यवस्था केली आहे, असे विधान केले होते. सध्या मुख्यमंत्रीही म्हादईसंदर्भात काही विधान करत नाहीत. दिल्लीत शिष्टमंडळ घेऊन ते परतले, तेव्हाही परब यांनी जास्त काही बोलणे टाळले होते. दुसरीकडे मनोज परब हे सरकारवर टीका करण्याऐवजी विरोधकांवर तुटून पडत होते.

Mahadayi Water Dispute
Goa Tourism: गोव्यात महोत्सव आयोजन महागले!

गेल्या वर्षी परब यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. शिंदे यांचे विशेष अधिकारी चिवटे हे परब यांचे गेल्या पाच वर्षांपासून मित्र असल्याची कबुली खुद्द परब यांनी दिली आहे. शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांना जवळचे आहेत आणि फडणवीस हे गोव्याचे भाजप प्रभारी आहे. हीच अमित शहा यांची व्यवस्था तर नाही, असा संशय गावकर यांनी व्यक्त केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com