डिचोलीत बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पहा व्हिडिओ

दैनिक गोमंतक
बुधवार, 5 मे 2021

डिचोली : कोविडच्या वाढत्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर आजपासून  डिचोलीत पाच दिवस कडकडीत टाळेबंदी पाळण्यातआला. काल  झालेल्या डिचोली पालिका मंडळ, सरकारी अधिकारी आणि व्यापाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय  घेण्यात आला.

डिचोली : कोविडच्या वाढत्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर आजपासून  डिचोलीत पाच दिवस कडकडीत टाळेबंदी पाळण्यातआला. काल  झालेल्या डिचोली पालिका मंडळ, सरकारी अधिकारी आणि व्यापाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय  घेण्यात आला. आजपासून (त. 5)  ते रविवारपर्यंत (ता. ९) असे  पाच दिवस शहरात कडक टाळेबंदी पाळण्यात येणार आहे. या काळात फक्त दवाखाने, औषधालये, पेट्रोल पंप, बँका आदी अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. तर हॉटेल, रेस्टॉरंट, किराणा माल आदी दुकाने बंद राहणार आहेत. या निर्णयामुळे उद्या (बुधवारी) डिचोलीचा साप्ताहिक बाजारही भरला नाही. त्यानुसार आज पहिल्याच दिवशी डिचोलीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद लॉकडाऊनला चांगलाच प्रतिसाद देण्यात आल्याचे पाहायला मिळाले.  (The spontaneous response of the citizens to the bandh in Dicholi) 

10  मे पर्यंत राज्यात अतिरिक्त निर्बंध लागू : प्रमोद सावंत 

डिचोली शहरात दिवसेंदिवस कोरोनाच्या  सक्रिय रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर यांच्या उपस्थितीत डिचोली पालिकेत एक महत्वाची बैठक झाली. या बैठकीस डिचोलीचे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर, पोलिस निरीक्षक महेश गडेकर आदी अधिकाऱ्यांसह नगराध्यक्ष पुंडलिक फळारी आणि  नगरसेवक उपस्थित होते.  डिचोली सामाजिक आरोग्य केंद्राच्या कार्य क्षेत्रात १०४७, साखळी  सामाजिक आरोग्य केंद्राच्या कार्य क्षेत्रात ८९४, तर मये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्य क्षेत्रात २४९ मिळून तालुक्यात २ हजार १९० सक्रिय रुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे.   

पहा व्हिडिओ  

संबंधित बातम्या