"सरकार तुमच्या दारी" कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद..: मुख्यमंत्री सावंत

सरकारच्या सर्व योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचविणे हेच माझ्या सरकारचे उद्दिष्ट आहे.असे उदगार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी काढले.
"सरकार तुमच्या दारी" कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद..: मुख्यमंत्री सावंत
Chief Minister Dr. Pramod SawantDainik Gomantak

सरकार तुमच्या दारी" ला संपुर्ण गोमंतकातील जनतेकडून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. सरकारच्या सर्व योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचविणे हेच माझ्या सरकारचे उद्दिष्ट आहे.असे उदगार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी काढले. साखळी येथील रवींद्र भवनात "सरकार तुमच्या दारी" या योजनेच्या उदघाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गोव्याचे मुख्य सचिव पुनित कुमार (Puneet Kumar), रँव्युनी सचिव संजय कुमार, उत्तर गोव्याचे आतिरिक्त जिल्हाधिकारी मामू हागे यांचीही उपस्थिती होती. मुख्यमंत्री बनल्यानंतर गेली अडीज वर्षे अगदी कठीण गेली.

पाळीचे जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर यांनी उपस्थितांचे स्वागत करुन प्रास्तविक केले.क्रांती नार्वेकर, रेश्मा मळीक, विनिषा मांद्रेकर यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ दिले. जोग यांनी संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आनंद काणेकर यानी आभार प्रदर्शन केले. यावेळी डिचोलीचे उपजिल्हाधिकारी दिपक वायंगणकर, डिचोलीचे मामलेदार प्रविणजय पंडीत तसेच विविध खात्यांच्या सरकारी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सरकारच्या विविध योजनांचे लाभ लाभार्थींना वितरण करण्यात आले. उदघाटन कार्यक्रम झाल्यानंतर साखळीच्या सरकारी महाविद्यालयात "सरकार तुमच्या दारी" साठी तीस खोल्यांमध्ये तीस खात्यांच्या कामांची व्यवस्था करण्यात आली होती. सरकारी कामे करुन घेण्यासाठी असंख्य नागरिकांनी हजेरी लावली होती.

Chief Minister Dr. Pramod Sawant
Goa: उगेतील ‘त्या’ खाणी कायदेशीरच, खडी खाणमालकांचा दावा

..तर गोवा 100 टक्के कोविडमुक्त"

मुख्यमंत्री डॉ.सावंत पुढे म्हणाले गोव्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचा सहकार्याने " पहिल्या वँक्सीनचा 100 टक्के कोटा पुर्ण केला. हे करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. दुसरे वँक्सीनही येत्या 30 आँक्टोबर पर्यंत 100 टक्के पुर्ण करुन गोवा हे "कोविड मुक्त" राज्य घोषित करणार आहे. सध्या कॉग्रेसला केंद्रात तसेच गोव्यात नेतृत्वच नाही.जनतेचा कॉग्रेस व इतर विरोधी पक्षावरीलवरील विश्वासच उडालेला आहे.त्यांनी रथ यात्रा काढल्या तरी जनता बळी पडणार नाही. येत्या 23 आँक्टोंबरला पंतप्रधान मोदी दिल्लीत बसून गोव्यातील गावातील स्वयंमित्रांशी चर्चा करणार आहेत. जे यापुर्वी कधीच घडले नव्हते ते प्रथमच घडत आहे. असे मुख्यमंत्री डॉ.सावंत म्हणाले. यावेळी बोलताना मुख्य सचीव पुनित कुमार म्हणाले.गोव्यात भाजप सरकारने राबवलेला हा एक स्तुत्य उपक्रम असून गोव्यातील ही योजना आता देशभर पसरणार आहे.

Chief Minister Dr. Pramod Sawant
Goa Election: काँग्रेस-तृणमूलमध्ये वादाची ठिणगी, युतीची शक्यता धूसर

पाळीचे जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर यांनी उपस्थितांचे स्वागत करुन प्रास्तविक केले.क्रांती नार्वेकर, रेश्मा मळीक, विनिषा मांद्रेकर यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ दिले. जोग यांनी संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आनंद काणेकर यानी आभार प्रदर्शन केले. यावेळी डिचोलीचे उपजिल्हाधिकारी दिपक वायंगणकर, डिचोलीचे मामलेदार प्रविणजय पंडीत तसेच विविध खात्यांच्या सरकारी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सरकारच्या विविध योजनांचे लाभ लाभार्थींना वितरण करण्यात आले. उदघाटन कार्यक्रम झाल्यानंतर साखळीच्या सरकारी महाविद्यालयात "सरकार तुमच्या दारी" साठी तीस खोल्यांमध्ये तीस खात्यांच्या कामांची व्यवस्था करण्यात आली होती. सरकारी कामे करुन घेण्यासाठी असंख्य नागरिकांनी हजेरी लावली होती.

Related Stories

No stories found.