मुरगाव तालुक्यातील मतदारसंघातही 24 तास पथके असणार कार्यरत

त्यांच्या मदतीला दक्षता पथके व स्टॅटिक सर्व्हेलन्स तैनात करण्यात आली आहेत.
Goa Assembly Election 2022
Goa Assembly Election 2022Dainik Gomantak

गोवा: निवडणूक काळात गैरप्रकार होऊ नये यासाठी निवडणूक जाहीर झाल्यापासून राज्यातील निवडणूक यंत्रणा अधिक सक्रिय झाली असून, तालुक्यातील प्रत्येक मतदार संघात तपासणी भरारी तसेच दक्षता पथकाबरोबर आता ' स्टटिक सर्वेलन्स टीम' तैनात करण्यात आली आहे. मुरगाव तालुक्यातील कुठ्ठाळी, दाबोळी, वास्को, मुरगाव मतदारसंघातही 24 तास सदर पथके कार्यरत झाली आहेत. (Goa Assembly Election: Squads will be working 24 hours in constituency of Mormugao taluka)

Goa Assembly Election 2022
बोडगेश्‍‍वराचा शनिवारपासून जत्रोत्‍सव सुरु

निवडणूक जाहीर होताच तसेच आचारसंहिता (Code of Conduct) लागू झाल्याने राज्यात 14 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election) केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निर्बंधाचे राजकीय पक्षांनी काटेकोरपणे पालन करावे. तसेच निवडणूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी राज्यातील (Goa State) चाळीसही विधानसभा मतदारसंघात 24 तास भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. त्यांच्या जोडीला दक्षता पथके व स्टॅटिक सर्व्हेलन्स तैनात करण्यात आली आहे. मुरगाव तालुक्यातील कुठ्ठाळी, दाबोळी, वास्को व मुरगाव मतदारसंघात (Goa Constituency) केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्बंधाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक मतदार संघात दोन भरारी पथके नियुक्त केली आहेत. ही भरारी पथके 24तास कार्यरत आहेत. निवडणूक प्रचारावेळी पैशांची तसेच वस्तूंचे वितरण मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने, निवडणूक अधिकाऱ्यांनी वाहनांची तपासणी सुरू केली आहे. तसेच काही राजकीय नेत्यांनी आपल्या कार्यालयाबाहेर आपले नामफलक ठेवण्यात आले होते, त्यांचे फलकही हटविण्यात आले आहेत.

Goa Assembly Election 2022
Goa University:..त्यामुळे गोवा विद्यापीठाने परीक्षा तीन आठवड्यांनी पुढे ढकलल्या

दरम्यान,

  • मुरगाव तालुक्यातील कुठ्ठाळी मतदार संघात श्रीधर लोटलीकर (सहाय्यक वाहतूक संचालक,(98221755212), शंभु कुंडेकर (मुरगाव नगरपालिका 7972643841), पुरुषोत्तम बिंद ( वीज विभाग वास्को, कनिष्ठ अभियंता (7798103779), आयरिश आंताव परेरा (पुरातनत्व विभाग संचालनालय, 9822139704), अवितो फर्नांडिस( हेडमास्टर सेंट जोसेफ इन्स्टिट्यूट, 9922541523), ॲन्थोनी जॉर्ज ( एमपीटी सीएमई विभाग, 9822462654) आदी अधिकारी वर्ग भरारी पथक म्हणून कार्यरत आहेत.

  • दाबोळी मतदार संघात ॲन्थोनी फर्नांडीस( सहाय्यक अभियंता, वेर्णा सार्वजनिक बांधकाम विभाग, अनिरुद्धा पवार( कनिष्ठ अभियंता मुरगांव पालिका,9673173625), जोएल फर्नांडिस (सहाय्यक अभियंता) सा.बा. वि. घोगळ,9766307075), प्रभाकर खेडेकर (वाहतूक विभाग वास्को,7722048687), संजय बाणावलीकर (बांधकाम अभियंता, एमपीटी 9422641444), शंकर गावकर (प्रिन्सिपल केशव स्मृती हायस्कूल दाबोळी) आदी अधिकारी भरारी पथक म्हणून कार्यरत आहेत.

  • वास्को मतदार संघात आशिष पाटणेकर (कनिष्ठ अभियंता, गटविकास अधिकारी मडगाव,8552080707), सावियो परेरा (सहाय्यक अभियंता गोवा शिपयार्ड 9960323421), विक्टर बारबोझा, (सहाय्यक अभियंता वीज खाते, वास्को) 8380015307 रिचर्ड अंताव (वाणिज्य कर विभाग वास्को,9049981147), अविनाश चलवादी (कनिष्ठ अभियंता वीज विभाग वास्को, 8380015307), धीरज बोरकर (कनिष्ठ अभियंता वीज विभाग वास्को,9923119045), आदी अधिकारीवर्ग भरारी पथक म्हणून तैनात आहेत.

  • मुरगाव मतदार संघात, भावेश आमोणकर (वाहतूक निरीक्षक, वास्को वाहतूक विभाग,9822583483), नारु फडते (वाहतूक निरीक्षक वास्को, वाहतूक विभाग,9822159622), देविदास फळदेसाई (सहाय्यक अभियंता, एमपीटी, 9075453606), विपुल मार्दोळकर (पालिका अभियंता, मुरगाव पालिका, 8788621352), मिस्कित आगुस्तीन, (मुरगाव पालिका, 9850459644), रवींद्र नाईक (गटविकास अधिकारी कार्यालय फोंडा,7972238177) आदी अधिकारी वर्ग भरारी पथक म्हणून कार्यरत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com