BJP In Goa on ST Reservation: ‘एसटी’ आरक्षणाला पाठिंब्याचे आवाहन

भाजप एसटी मोर्चातर्फे ‘उटा’ आंदोलनातील हुतात्म्यांना श्रद्धांजली
Goa BJP
Goa BJPGomantak Digital Team

BJP In Goa on ST Reservation: 2011साली आपल्या मागण्यांसाठी केलेल्या ‘उटा’च्या आंदोलनावेळी बलिदान दिलेल्या स्व. मंगेश गावकर व स्व. दिलीप वेळीप यांना भारतीय जनता पक्षाच्या एसटी मोर्चाने आज श्रद्धांजली वाहिली.

हा कार्यक्रम भाजपच्या दक्षिण गोवा जिल्हा कार्यालयात पार पडला. या कार्यक्रमात सर्वच वक्त्यांनी एसटी समाजाच्या राजकीय आरक्षणाला पाठिंबा दर्शविला तसेच एसटी समाजातील सर्वांनी एकत्रित काम करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाला राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, गोवा कमिशन एससी-एसटीचे चेअरमन दीपक करमळकर, प्रभाकर गावकर, शाणू वेळीप, मोहन गावकर, ॲंथनी बार्बोजा, डॉ. दिवाकर वेळीप, धाकू मडकईकर, कामिल बार्रेटो, पिएदाद नोरोन्हा हे उपस्थित होते.

सभापती रमेश तवडकर हेसुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र, त्यांनी केवळ समई प्रज्वलित करून स्व. मंगेश व स्व. दिलीप यांच्या फोटोंना फुले अर्पण केली. त्यांनी व्यासपीठावर बसण्याचे टाळले.

Goa BJP
Goa Traffic Rule: भावांनो... एक जूनपासून वेगावर मर्यादा ठेवा!

मागण्यांसाठी राजकारण, गटबाजी करू नये...

  • एसटी समाजाच्या बहुतांश मागण्या मान्य होत आहेत. मागण्या मांडण्यासाठी समाजामध्ये राजकारण आणू नये व गटबाजी करू नये, असे आवाहन बाबू कवळेकर यांनी केले.

  • दोघांचेही बलिदान समाजाच्या उन्नतीसाठी फलदायी ठरो. आम्ही सर्व एकत्र राहूया व सरकारकडून मागण्या मान्य करून घेऊया, असे आवाहन धाकू मडकईकर यांनी केले.

Goa BJP
'गोव्यात येण्यापूर्वी जनरेटरची सोय आहे का चेक करा', महिला उद्योजक बोलली अन् सुरू झालंय 'ट्विटर वॉर'
  • पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी ओबीसी, एससी व एसटीला आरक्षण मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व सरकारचे आभार मानणाऱ्या मोहन गावकर यांनी मांडलेल्या ठरावाला मंजुरी देण्यात आली.

  • २०११ मध्ये जे ‘उटा’चे आंदोलन झाले त्यात सभापती रमेश तवडकर यांचे खूप मोठे योगदान आहे. आपण संसदेत एसटी समाजाला आरक्षण देण्याचा ठराव मांडला; पण कॉंग्रेसने त्यास विरोध केला, असे राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com