बेकायदेशीर राहणाऱ्यांविरुद्ध हरमल किनाऱ्यावर शोध मोहीम

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

पेडणे पोलिसांनी हरमल येथील विविध किनारी भागात आज  संध्याकाळी बेकायदशीर राहणाऱ्यांविरुद्ध शोध मोहीम (कोंबिंग ऑपरेशन) राबविल्याची  माहिती पेडणे पोलिस ठाण्याचे निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिली.

 पेडणे : पेडणे पोलिसांनी हरमल येथील विविध किनारी भागात आज  संध्याकाळी बेकायदशीर राहणाऱ्यांविरुद्ध शोध मोहीम (कोंबिंग ऑपरेशन) राबविल्याची  माहिती पेडणे पोलिस ठाण्याचे निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिली.

निरीक्षक दळवी म्हणाले, कोंबिंग ऑपरेशन हे देशी व विदेशी लोक बेकायदेशीर व्यवसायात गुंतलेले आहेत व बेकायदेशीररीत्या रहात आहेत तसेच ज्या कुणी अशा लोकांना आपली आस्थापने व्यवसायासाठी दिली असतील किंवा अशा गैर व्यवहारासाठी दिली असतील त्यांना यावेळी कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. या मोहिमेअंतर्गत ५० व्यक्तींची तपासणी करण्यात आली. येत्या काही दिवसांत तालुक्यातील अन्य समुद्र किनाऱ्यांवरही कायदा व सुव्यवस्थेसाठी अशाच प्रकारची मोहीम राबविणार असल्याची माहिती निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिली.

संबंधित बातम्या