Corona Update : दोडामार्गात कोरोना लसीकरणास प्रारंभ

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

तालुक्‍यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा प्रारंभ झाला.

दोडामार्ग : तालुक्‍यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा प्रारंभ झाला. वैद्यकीय अधीक्षक ज्ञानेश्‍वर ऐवाळे यांनी सर्वांत प्रथम तर त्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी रमेश कर्तसकर यांनी लस घेतली. त्यांना आरोग्य सेविका सुरेखा भणगे यांनी लस दिली. 

''भाजपाची 'ट्रोल आर्मी' वास्तविक इतिहास लपवून चुकीची माहिती...

येथील ग्रामीण रुग्णालयाच्या मागे असलेल्या सभागृहात लसीकरण कक्ष बनविण्यात आला आहे. तालुक्‍यात कोविड लसीकरणाचा शुभारंभ काल (ता.8) येथील ग्रामीण रुग्णालयात तहसीलदार अरुण खानोलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार संजय कर्पे, मुख्याधिकारी शिवराज गायकवाड, पोलिस निरीक्षक महेंद्र घाग, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रामदास रेडकर, गजानन भणगे, मकरंद करमळकर आदींसह रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका आणि आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. आरोग्य विभागाकडेसध्या एक हजार लस उपलब्ध झाल्या आहेत.

गोव्यातील बैलांच्या झुंजी आयोजकांवर पोलिसांच्या खास पथकाचे लक्ष

कोविड लस बाबत मनात अजिबात भीती बाळगू नका, ती पूर्णपणे सुरक्षित आहे, असे मत तहसीलदार खानोलकर यांनी यावेळी मांडले. ते म्हणाले, "कोरोना काळात शासकीय कर्मचाऱ्यांनी जीव धोक्‍यात घालत काम केले. अशा सर्वांचे मी कौतुक करतो. आता लसीकरण सुरू झाले आहे. याला सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे.'' तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कर्तस्कर म्हणाले, "तालुक्‍यात 531 जणांची नोंदणी झाली आहे. हे सर्व आरोग्य विभागातील डॉक्‍टर, आरोग्य सेवक, सेविका आशा सेविका कर्मचारी आहेत. या सर्वांनी मोबाईलवर आलेल्या मेसेजवरील वेळेत लस टोचून घ्यावी. तालुक्‍यातील हा पहिला टप्पा सात ते आठ दिवसात पूर्ण होणार आहे.'' वैद्यकीय अधीक्षक डॉ. ऐवाळे यांनीही मनोगत व्यक्त केले.

संबंधित बातम्या