सासष्टीत गणेशमूर्ती रंगविणे सुरू

TUKARAM GOVEKAR
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

गोमंतकीयांचा अत्यंत आवडीचा उत्सव म्हणजे गणेश चतुर्थी मोठ्या भक्तिभावाने श्री गणेशाचे आगमन केले जाते. मात्र यंदा कोरोना महामारीच्या संकटामुळे गोव्यात दीड दिवसाचा उत्सव साजरा करण्याचा निर्णय अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे.

नावेली

मडगाव, बाळ्ळी, बेतूल, कुंकळ्ळी भागातील गणपती चित्र शाळेमध्ये सध्या शेवटच्या टप्प्यात गणेश मूर्तीवर कारागीर शेवटचा हात फिरवताना दिसत आहेत. अनेक चित्रशाळांमध्ये गणपतीच्या मूर्ती रंगवून तयार आहेत.
बाळ्ळी येथील मधू कृष्णा नाईक यांनी आपण सर्व गणपतीच्या मूर्ती शेवटच्या टप्प्यात रंगवण्याचे काम सुरू आहे मधू नाईक यांची नात युगा श्यामसुंदर नाईक ही रंगकाम करीत आहे. कुटूंबातील सर्वच सदस्य या कामात हातभार लावतात. बेतूल येथील दत्ता जुवेकर गणेश चित्रशाळेतही गणपतीच्या मूर्ती रंगविण्याचे काम शेवटच्या टप्प्यात सुरू असल्याचे संदेश जुवेकर यांनी सांगितले.
मडगावात सूर्यकांत प्रियोळकर, सुशांत शेटकर व रूपेश च्यारी यांच्या गणपती चित्र शाळेमध्ये सध्या शेवटच्या टप्प्यात गणेश मूर्तीवर हात फिरवण्याचे काम नेटाने सुरु आहे. सूर्यकांत प्रियोळकर यांनी आपल्या
तिन्ही चित्रशाळेतून सुमारे एक हजार गणपतीच्या मूर्ती तयार केल्या जातात असे सांगितले. गणेश चतुर्थी उत्सवाला पाच दिवस शिल्लक असताना रात्री जागून गणपती मूर्ती रंगविण्याचे काम सुरू आहे.

संबंधित बातम्या