मल्टिलेव्हल पार्किंग प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करा शॅडो कौन्सिल फॉर मडगावतर्फे मागणी

वार्ताहर
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

 मडगाव पालिका इमारतीच्या मागच्या बाजूला सिनेलता जवळील नियोजित मल्टि लेव्हल पार्किंग प्रकल्पाचे काम कोनशिला बसवून पाच वर्षे पूर्ण झाली तरी पालिकेने अद्याप काम सुरू केले नसल्याने पालिकेने त्वरित काम सुरू करावे अशी मागणी शॅडो कौन्सिल फॉर मडगावचे वतिने मंगळवारी प्रकल्पाच्या जागेवर शांती पुर्ण निदर्शने करून करण्यात आली.

नावेली:  मडगाव पालिका इमारतीच्या मागच्या बाजूला सिनेलता जवळील नियोजित मल्टि लेव्हल पार्किंग प्रकल्पाचे काम कोनशिला बसवून पाच वर्षे पूर्ण झाली तरी पालिकेने अद्याप काम सुरू केले नसल्याने पालिकेने त्वरित काम सुरू करावे अशी मागणी शॅडो कौन्सिल फॉर मडगावचे वतिने मंगळवारी प्रकल्पाच्या जागेवर शांती पुर्ण निदर्शने करून करण्यात आली.

यावेळी शॅडो कौन्सिल फॉर मडगावचे निमंत्रक सावियो कुतिन्हो,राधा कवळेकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

कुतिन्हो यांनी यावेळी बोलताना या प्रकल्पाची कोनशिला बसवून आज १५ सप्टेंबर रोजी पाच वर्षे पूर्ण होत आहेत. त्यावेळी निवडणूका जवळ आल्याने कोनशिला बसविण्यासाठी सुमारे ३ लाख रुपये खर्च केला होता.गेल्या वर्षी १५ सप्टेंबर रोजी शॅडो कौन्सिलने प्रकल्पाची थर्माकोल प्रतिकृती तयार करून माॅक इनोग्रेशन करण्यात आले होते.या प्रकल्पा साठी सरकार कडून तांत्रिक मंजुरी आवश्यक असते मात्र ३६५ दिवस पुर्ण झाले तरी अद्याप मंजूरी घेण्यात आलेली नाही.
ज्या ठिकाणी प्रकल्प उभारण्यासाठी जागा संपादन केली होती ती आता सुका कचरा साठवून बेलींग करण्यासाठी वापरण्यात येत आहे.

मडगाव पार्किंग समस्या सोडविण्यासाठी पार्किंग प्रकल्पाची नितांत गरज आहे.लोकाना पार्किंगसाठी पालिका उद्यानाला तीन ते चार फेऱ्या माराव्या लागत आहेत.मडगाव पालिका मंडळाचा कार्यकाळ संपत आला असून या पालिका मंडळाला प्रकल्प उभारण्यासाठी इच्छाशक्ती नाही.तरी स्थानिक आमदारांनी लक्ष घालून मडगावात मल्टी लेव्हल पार्किंग प्रकल्प उभारावा अशी मागणी कुतिन्हो यांनी यावेळी केली. 

संबंधित बातम्या