मार्गदर्शक तत्त्वानुसार दहावीच्या परीक्षेला प्रारंभ

X Exam Start as par gideling
X Exam Start as par gideling
डिचोली,  (प्रतिनिधी) : दीड महिन्याहून अधिक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार आजपासून (गुरुवारी) दहावीच्या परीक्षेला प्रारंभ झाला. आज व्यावसायिक विषयाशी संबंधित पेपर असल्याने डिचोलीत मोजक्‍याच फक्‍त तीन विद्यार्थ्यांनी तिखाजनच्या विजयानंद उच्च माध्यमिक विद्यालय उपकेंद्रात हा पेपर दिला. अशी माहिती उपलब्ध झाली आहे. शनिवारपासून मुख्य विषयांच्या परीक्षेला सर्व विद्यार्थी बसणार असल्याने, त्याच दिवसापासून खऱ्याअर्थाने परीक्षेचा माहोल तयार होणार आहे.
दरम्यान, राज्याच्या सिमावर्ती भागातील विद्यार्थ्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या उपकेंद्रात बदल करताना ते आता भेडशी-दोडामार्ग येथील न्यू इंग्लिश हायस्कुलात स्थापन करण्यात आले आहे. या उपकेंद्रात ६३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे. पूर्वी हे उपकेंद्र खोलपेच्या शिवाजीराजे हायस्कूलात स्थापन करण्यात आले होते.
बारावीची परीक्षा !
दुसऱ्याबाजूने डिचोलीत इयत्ता बारावीच्या दोन विषयांची परीक्षा एकदाची आज (गुरुवारी) संपल्याने डिचोलीतील विद्यार्थ्यांनी एकदाचा सुटकेचा श्वास घेतला आहे. डिचोलीतील बारावीच्या विद्यार्थ्यांचे फक्‍त दोनच विषयांचे पेपर शिल्लक होते. काल मराठी विषयाचा तर आज राज्यशास्त्र विषयाचा पेपर झाला. ५०५ विद्यार्थ्यांनी काल मराठी व्दितीय भाषा या विषयाचा तर आज १११ विद्यार्थ्यांनी राज्यशास्त्र विषयाचा पेपर दिला. जवळपास दोन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर उर्वरीत विषयांच्या परीक्षेला सुरवात कालपासून झाली होती. 'कोविड' महामारीच्या संकटामुळे काही विद्यार्थ्यांवर काहीसे दडपण असल्याचे जाणवत होते. तरीदेखील डिचोलीतील विद्यार्थ्यांनी पूर्ण तयारीनिशी परीक्षा दिली. बहुतेक विद्यार्थ्यांनी पेपर हातात पडण्यापुर्वीच केंद्रात उपस्थिती लावून आपले आसनग्रहण केले होते. प्रथमच चेहऱ्यावर मास्क परिधान करुन आणि सामाजिक अंतर पाळून पेपर लिहिण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली. तरीदेखील विद्यार्थ्यांनी गडबड-गोंधळाशिवाय दोन्ही विषयांचे पेपर दिले. या परीक्षेसाठी डिचोलीत श्री शांतादुर्गा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय आणि मुळगाव येथील ज्ञानविकास मंडळ उच्च माध्यमिक विद्यालय या उपकेंद्रात आसनव्यवस्था करण्यात आली होती. सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांची भेडशी-दोडामार्ग येथील विद्यालयात सोय करण्यात आली होती. परीक्षेसाठी मुख्य नियंत्रक म्हणून प्रा. संदीप सावळ तर निरीक्षक म्हणून प्राचार्य उमेश नाईक यांनी जबाबदारी सांभाळली.  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com