डॉक्टरांच्या चोवीस तास  उपस्थितीत कोविड भरतीपूर्व हॉस्पिटल सुरू

Dr.Pramod Sawant Meeting
Dr.Pramod Sawant Meeting

पणजी: कोरोनाची कमी लक्षणे (Coronavirus) असलेल्या कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये एक कोविड भरतीपूर्व हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे. उद्या 6 पासून तालुक्यातील सामाजिक आरोग्य केंद्रांमध्ये हे कोविड भरतीपूर्व (Step-up) हॉस्पिटल (Hospital) तथा विभाग सुरू होईल. त्यामध्ये एक डॉक्टर 24 तास तैनात ठेवण्यात येईल.  तसेच एक रुग्णवाहिकाही त्यांच्या मदतीला असेल. ज्यांना ऑक्सिजनची (Oxygen) गरज नाही, अशा रुग्णांना या हॉस्पिटलमध्ये ठेवले जाईल.  त्यांना गरज लागते, त्यांना सदर रुग्णवाहिकेतून म्हापसा, बांबोळी, मडगाव या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या हॉस्पिटलवर पडणारा ताण कमी होईल. त्याचबरोबर ऑक्सिजनची खरीच गरज असलेल्यांनाच ऑक्सिजन पुरवण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी (Dr.Pramod Sawant) सांगितले. ( Started pre-recruitment Covid hospital in the presence of doctors)

गोव्यातील 8 तालूक्यात सूरू होणार कोरोना भरतीपूर्व हॉस्पिटल्स
 
श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडिअम यापूर्वी फक्त कोरोना उपचार केंद्र म्हणून वापरले जात होते. ते आता कोविड भरतीपूर्व इस्पितळ म्हणून वापरले जाणार आहे. डिचोली, कासावली व चिखली येथेही अशीच इस्पितळे उद्यापासून सुरु  होत आहेत. सध्या ऑक्सिजन सिलिंडरची मोठ्या प्रमाणात गरज वाढल्यामुळे त्याची उपलब्धता ही मोठ्या प्रमाणात करणे क्रमप्राप्त आहे. आता ऑक्सिजन सिलिंडर मिळत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.सिरम इन्स्टिट्यूटने (Serum Institute) सुमारे 70 हजार लस उपलब्ध असल्याचे सांगितले होते. पण आपण एकाच वेळी पाच लाखाची गरज आहे. ती उपलब्ध झाल्यानंतरच 18 वर्षावरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस (Corona Vaccine) देण्यात येणार आहे. सध्या 45 वर्षावरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत असून ती ज्यांनी घेतली नाही, त्यांनी ती घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

स्वार्थासाठी राजकारण
कोरोना नियंत्रणासाठी चर्चा करण्यासाठी दोन वेळा सर्वपक्षीय वर्च्यअल बैठकीचे आयोजन आपण केले होते. त्यावेळी विरोधी पक्ष नेते सहभागी झाले. मात्र गोवा फॉरवर्डचा एकही आमदार या दोन्ही बैठकीमध्ये सहभागी झाला नाही. मात्र आता कोरोनाचे राजकारण करून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई करत आहेत. आतापर्यंत गोवा सरकारने राज्यातील सुमारे पावणेचार लाख लोकांना मोफत कोरोना प्रतिबंधक लस दिलेली असताना, गोवा सरकारने मोफत लस द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते करतात. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत कामत यांनी लसीचे दोन्ही डोस मोफतच घेतलेले आहेत. पण तरीही मोफत लस उपलब्ध करा, अशी मागणी ते करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com