वैद्यकीय कचरा विल्हेवाटीसाठी अत्याधुनिक सुविधा

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

वैद्यकीय कचरा हा अत्यंत घातक असा कचरा आहे हे आधी समजून घ्यायला हवे.

पणजी : गोव्यात वैद्यकीय कचरा  विल्हेवाटीसाठी प्रथमच सुविधा निर्माण केलेली आहे. ही सुविधा सशुल्क असल्याने त्यासाठी कंत्राटदार नेमावा लागलेला आहे. यात कोणताही घोटाळा नाही, असे कचरा व्यवस्थापन मंत्री  मायकल  लोबो  यांनी  आज  काणकोण  येथे सांगितले. ते स्वयंपूर्ण गोवा  या योजनेअंतर्गत काणकोण तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्या दरम्यान म्हणाले, गोवा फॉरवर्ड  या  विरोधी पक्षाने  वैद्यकीय कचरा व्यवस्थापनावर घोटाळ्याचा केलेला आरोप चुकीचा आहे. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आरोप करण्यात आलेला आहे.

गोवा सरकारला केंद्रीय योजनांची भरीव मदत: पशुसंवर्धन मंत्री गिरीराजसिंह

आजपर्यंत केवळ बांबोळी येथे सरकारी इस्पितळात वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था होती, मात्र त्या सरकारी इस्पितळालाच अपुरी पडत होती, म्हणून कुंडई येथील औद्योगिक वसाहतीतील भूखंडावर वैद्यकीय कचरा उच्च दाबाने जाळण्यासाठी यंत्र बसवण्यात आलेले आहे. हा प्रकल्प अत्याधुनिक आहे.आज वर अशी सुविधा नसल्यामुळे वैद्यकीय कचरा कुठेतरी डोंगरात फेकला जात असे, या सार्‍याचा परिणाम पर्यावरणावर होत असे. वैद्यकीय कचरा हा अत्यंत घातक असा कचरा आहे हे आधी समजून घ्यायला हवे. त्याची योग्य अशीच विल्हेवाट लावली गेली पाहिजे. यासाठी ही यंत्रणा निर्माण केली आहे अर्थात ती सशुल्क असल्याने दवाखाने इस्पितळे यांच्या चालकांना त्यासाठी पैसे द्यावेच लागणार आहेत. यात कोणताही घोटाळा नाही. या कचरा व्यवस्थापनाचे  दर जास्त वाटत असल्यास भविष्यात ते कमी करण्याचा विचार करता येईल मात्र  यात  कोणत्याही  प्रकारचा  घोटाळा  नाही.

संबंधित बातम्या