हॉटेल संघटनेची राज्य शाखेवर आल्बुकर्क, रामोश यांची निवड

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

हॉटेल असोसिएशन ऑफ इंडियाच्या राज्य शाखेच्या सदस्यपदी अल्कॉन व्हिक्टर उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक व्हीक्टर आल्बुकर्क आणि आयएचसीएल गोवाचे विभागीय  संचालक आणि ताज हॉटेल ॲण्ड कन्वेन्शन सेंटरचे सरव्यवस्थापक विन्सेंट रामोश यांची निवड करण्यात आली आहे.

पणजी :  हॉटेल असोसिएशन ऑफ इंडियाच्या राज्य शाखेच्या सदस्यपदी अल्कॉन व्हिक्टर उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक व्हीक्टर आल्बुकर्क आणि आयएचसीएल गोवाचे विभागीय  संचालक आणि ताज हॉटेल ॲण्ड कन्वेन्शन सेंटरचे सरव्यवस्थापक विन्सेंट रामोश यांची निवड करण्यात आली आहे.

हॉटेल असोसिएशन ऑफ इंडियाने आभासी पद्धतीने घेतलेल्या बैठकीत या निवडी केल्या. संघटनेच्या ८४ व्या कार्यकारीणी बैठकीत सदस्यत्व मोहीम देशभर राबवण्याचे ठरवण्यात आले आहे. यासाठी राज्या राज्यांतील शाखांना जबाबदारी देण्यात आली आहे. आल्बुकर्क हे स्थापत्य अभियांत्रिकी विद्याशाखेचे पदवीधर असून हॉटेल, इस्पितळांची उभारणी तसेच व्यवस्थापन क्षेत्राचा त्यांना ४० वर्षांहून अधिक कामकाजाचा अनुभव आहे. जगभरातील भ्रमंतीदरम्याच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी राज्यात पर्यटन तसेच वैद्यकीय पर्यटन क्षेत्रात विविध उपक्रमांची  संकल्पना आखत त्यांची यशस्वीपणे उभारणीही केली आहे. 

राज्यात रेंट बॅक संकल्पना त्यांनीच राबवली आणि अल्पावधीत ती  यशस्वी ठरली आहे.
रामोश यांच्याकडे आतिथ्य उद्योग क्षेत्रातील २७ वर्षांचा अनुभव आहे. २०१६ मध्ये उमेद भवन पॅलेस जोधपूरचे ते सरव्यवस्थापक असताना ट्रीप ॲडव्हायजरचा जगातील सर्वोत्तम हॉटेल म्हणून पुरस्कार मिळाला आहे. संघटना आता सदस्य विस्तार करणार असून, सरकारसोबत विविध विषयांवर भागीदारीनेही काम करणार आहे.

संबंधित बातम्या