राज्य निवडणूक आयुक्त चोखा राम गर्ग यांनी दिला राजीनामा

दैनिक गोमन्तक
रविवार, 14 मार्च 2021

गोव्यातील पालिका प्रभाग आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयुक्त चोखा राम गर्ग यांच्या विरुद्ध कडक ताशेरे ओढल्यानंतर त्यांनी आपल्या आयुक्तपदाचा राजीनामा आज दिला आहे. 

गोव्यातील पालिका प्रभाग आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयुक्त चोखा राम गर्ग यांच्या विरुद्ध कडक ताशेरे ओढल्यानंतर त्यांनी आपल्या आयुक्तपदाचा राजीनामा आज दिला आहे. 

एनडीएतून सोडलेली रॉकेटस भेदण्याचे काॅंग्रेसकडे सामर्थ्य; सरदेसाई यांना...

सरकारने ते कायदा सचिव असताना त्यांच्याकडे राज्य निवडणूक आयुक्त पदाचाअतिरिक्त ताबा दिला होता. राज्य निवडणूक आयुक्त हे घटनात्मक पद असल्याने त्याचा अतिरिक्त ताबा देणे घटनेचे उल्लंघन करणारे आहे असे निरीक्षण करून सर्वोच्च न्यायालयाने जर अशा प्रकारचा अतिरिक्त ताबा सरकारी अधिकाऱ्यांकडे दिलेला असल्यास राज्याने त्यांना त्वरित त्यातून मुक्त करावे असे निर्देश दिले होते. त्यानंतर आता राज्य निवडणूक आयुक्त चोखा राम गर्ग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.  

संबंधित बातम्या