राज्यात थंडीची चाहूल 

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडी वाढू लागली आहे. रात्री आणि पहाटे थंडी जाणवत आहे. सकाळी सातवाजेपर्यंत चांगल्या प्रमाणात धुके पडलेले असते. ज्याप्रमाणे यावर्षी पाऊस सरासरी प्रमाणापेक्षा अधिक झाला आहे,

पणजी  : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडी वाढू लागली आहे. रात्री आणि पहाटे थंडी जाणवत आहे. सकाळी सातवाजेपर्यंत चांगल्या प्रमाणात धुके पडलेले असते. ज्याप्रमाणे यावर्षी पाऊस सरासरी प्रमाणापेक्षा अधिक झाला आहे, त्याचप्रमाणे थंडीही येत्या काही काळात अधिक वाढणार असल्याची माहिती राज्यातील हवामान तज्ज्ञ देत आहेत.

गोवा वेधशाळेने माहितीनुसार, १४ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील वातावरण कोरड्या स्वरूपाचे असणार आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात कमीत कमी २१ अंश सेल्सिअस आणि जास्तीत जास्त ३४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हे तापमान आणखी कमी होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सकाळी फिरायला येताना लोक स्वेटर घातलेले दिसत आहेत, मिरामार किनाऱ्यानजीकच्या परिसरासोबत मांडावी नदीवरही धुक्याची झालर पसरलेली पहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या