कोरोना रुग्ण बरे होण्याच्या दरात गोवा देशात तिसऱ्या क्रमांकावर

RECOVERY RATE OF GOA.jpg
RECOVERY RATE OF GOA.jpg

पणजी : देशभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. अशातच इतर राज्यांच्या तुलनेत गोवा लहान राज्य असूनही कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचे दिसत आहे. तर चिंताजनक बाब म्हणजे, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने गोव्यात रुग्णसंख्या बरे होण्याचा दर सर्वाधिक कमी असल्याची नोंद केली आहे. उत्तराखंड आणि कर्नाटक खालोखाल गोवा राज्य रुग्णसंख्या बरे होण्याच्या दरात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे केंद्रीय मंत्रालयाने सांगितले आहे. (The state of Goa ranks third in the country for corona  recovery rate) 

राष्ट्रीय सरासरीनुसार, प्रत्येकी एक लाख मृत्यूसंख्येमागे गोवा आणि दिल्ली राज्यात सर्वाधिक मृत्यू होत असल्याचे केंद्रीय मंत्रालयाने म्हटले आहे. गोव्याचा रुग्णसंख्या बरे होण्याचा दर 71.8% आहे जो राष्ट्रीय सरासरीपेक्षा 81.9% इतका कमी आहे. तर उत्तराखंडमध्ये 66.2%  आणि कर्नाटकमध्ये 69.8%. इतका रुग्णसंख्या बरे होण्याचा दर नोंदविण्यात आला आहे, जो राष्ट्रीय सरासरीपेक्षा सर्वात कमी आहे.

विशेष म्हणजे रुग्णसंख्या बरे होण्यात त्रिपुरा राज्य आघाडीवर आहे. त्रिपुरात 92.1% इतका रुग्णसंख्या बरे होण्याचा दर आहे. त्या खालोखाल दिल्ली 91.5% तर अरुणाचल प्रदेश 90.1% इतका रुग्णसंख्या बरे होण्याचे प्रमाण नोंदविण्यात आले आहे. त्याचबरोबर अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशात रुग्णसंख्या बरे होण्याचे प्रमाण 95.5% इतके असल्याची माहिती केंद्रीय मंत्रालयाने दिली आहे. मात्र आकडेवारीनुसार, गोव्यातील प्रत्येक 100 रूग्णांपैकी 71 रुग्ण बरे झाले आहेत. तर गोव्यात एकूण सक्रिय रुग्णांचा दर  27.9% इतका आहे.

रविवारी एकूण 5,671 जणांच्या नामुन्याची तपासणी करण्यात आली त्यापैकी 2,633 जणांचे अहवाल सकारात्मक आले. नवीन 2,633 रुग्णांपैकी 271 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर रविवारी केवळ 175 जण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत. नवीन रुग्णांनंतर राज्यात आता एकूण 31,875 इतकी सक्रिय रुग्णसंख्या झाली आहे.

सर्वात कमी लोकसंख्या आणि आरोग्यासाठी चांगले वातावरण असतानाही राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव इतक्या वेगाने पसरल्याने चिंता व्यक्त करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यात गोवा अपयशी का ठरला, याबाबत गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील एक डॉक्टरने सांगितले आहे. चुकीच्या वेळी कोरोनावर मात केल्याची घोषणा केल्यामुळे राज्यात कोरोनाचा वेगाने फैलाव झाला. अशातच राज्यसरकारने निवडणुकांसाठी घेतलेल्या राजकीय प्रचारसभा, मोर्चे आदि कार्यक्रमांमुळे कोरोनाचा वेगाने पसरला. सामुदायिक प्रसाराला येथूनच सुरवात झाली. तर काही रुग्ण उशिरा रुग्णालयात दाखल झाल्याने तर काही रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी दाखल न झाल्यामुळे मरण पावले, असे जीएमसी डॉक्टरांनी सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com