चिंबलमधील चर्चला ‘हेरिटेज टॅग’ ; सतराव्या शतकात बांधलेलं गोव्याचं प्राचीन चर्च

The State government of Goa has notified the Church and Convent of Our Lady of Mount Carmel Chimbel as the heritage site
The State government of Goa has notified the Church and Convent of Our Lady of Mount Carmel Chimbel as the heritage site

पणजी :  कधीकधी आपल्या आजुबाजूला असणाऱ्या जागा, वारसास्‍थळांची किंमत आपल्या लक्षात न आल्याने त्या दुर्लक्षित होतात आणि मोडकळीस येतात. असेच चिंबल येथील ‘मोंते कार्मो’ चर्चबाबत झाले होते. १७४७ - १७४९ च्या काळात पहिल्या गोमंतकीय ख्रिस्ती धर्मगुरूंनी बांधलेले हे चर्च गोव्यातील पहिले मानसोपचार इस्पितळसुद्धा होते. नगर आणि नियोजन खात्याने या चर्चला ‘हेरिटेज टॅग’ दिला असून या चर्चचे आता लवकरच संवर्धन होणार आहे.

गेल्या दोन वर्षांपासून इतिहासतज्‍ज्ञ प्रा. प्रजल साखरदांडे आणि ॲना ग्रासिएस यांच्या मुख्य सहभागाने ऐतिहासिक वारसा संवर्धन समितीने या चर्चला हेरिटेज टॅग मिळावा म्‍हणून प्रयत्न चालविले होते. यासाठी अनेक निवेदनेसुद्धा संबंधित सरकारी खात्यांना दिली होती. अखेर त्‍या प्रयत्नांना यश आले आहे. येत्या काही दिवसांत या चर्चची डागडुजी आणि येथील परिसराची साफसफाई करून हे चर्च पर्यटक आणि स्थानिकांना पाहण्यासाठी, पर्यटकांना अभ्‍यासण्‍यासाठी खुले केले जाणार आहे. चिंबल चर्चच्या परिसरात राहणाऱ्या काही व्यक्तींनी गेल्या दहा वर्षांपूर्वी या चर्चची अवस्था चांगली असल्याची माहिती दिली. कालांतराने ही वास्‍तू डागडुजीअभावी मोडकळीस येऊ लागली. या चर्चला हेरिटेज दर्जा दिल्‍यामुळे येथील गैरप्रकार दूर होतील.

"‘मोंते कार्मो’ हे चर्च १७व्‍या शतकातील असून त्‍याचे वैशिष्ट्य म्हणजे ते गोमंतकीय प्रिस्टने बांधले होते. हे चर्च तत्कालीन वास्तुबांधकामाचा अतिशय सुंदर नमुना आहे. चर्च बांधण्यात आलेल्या वर्षाचा उल्लेखसुद्धा येथे दगडावर केलेला आहे. चर्च सध्या जीर्णावस्‍थेत आहे,  तरीही त्‍या चर्चकडे पाहिल्यानंतर  सुंदर नक्षीकाम असलेल्या वास्तूकडे पाहतच राहावे, असे वाटते. हा हेरिटेज दर्जा गोव्याच्या वैभवात भर टाकणारा आहे."
-प्रा. प्रजल साखरदांडे, इतिहास संशोधक

यांचेही आहे महत्त्‍वाचे योगदान 

या चर्चला हेरिटेज दर्जा मिळवून देण्यासाठी निफा फर्नांडिस, लॉर्ड्स कन्सेप्शन, ब्रियन गोन्साल्विस, कॅटॅन फर्नांडिस, फर्नांडो वेल्हो, लिस्टर, अयास बन्‍सारी, आर्टुरो डिसोझा, फादर फुंदासाव द ओरिएंट, फादर युसिको, फादर आर्चीबाल्ड गोन्साल्विस, फादर सिल्विस्टर, व्हिक्टर गोन्साल्विस, आमदार टोनी फर्नांडिस आणि जॉन मार्शल यांच्‍यासह इतरांचीही मोलाची मदत झाली आहे. तसेच राज्य नगर आणि नियोजन खात्याचे राजेश नाईक यांचीसुद्धा महत्त्‍वाची भूमिका आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com