गोव्यात गांजा लागवडीस तूर्त परवानगी नाही- मुख्यमंत्री सावंत

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 30 डिसेंबर 2020

गोव्यात गांजा लागवडीस तूर्त परवानगी दिली जाणार नाही असे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

पणजी- गोव्यात गांजा लागवडीस तूर्त परवानगी दिली जाणार नाही असे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. विरोधकांकडून झालेल्या कडाडून विरोधानंतर त्यांनी स्पष्टीकरण देताना कोणताही प्रस्ताव आला तरी त्यावर विविध खात्यांची मते जाणून घ्यावी लागत असल्याचे म्हटले आहे. 

सरकारकडे प्रस्ताव आला तरी प्रस्ताव पुढे न्यायचा नाही, असे सरकारनेच ठरवले आहे. विरोधकांकडे सरकारवर टीका करण्यासाठी मुद्दे नसल्याने ते अशा नसलेल्या विषयांचा आधार घेत आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.ॉ

दरम्यान,  याबाबत आज काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने राज्य सरकारवर जोरदार टीका केली. राज्याला ड्रग्सचा अड्डा बनवत असल्याचा आरोप आज आम आदमी पक्षाकडून करण्यात आला. तर  सरकारने गांजा लागवडीला परवानगी दिल्यास काँग्रेस सरकारचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरेल, असा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला. 

संबंधित बातम्या