दहावी आणि बारावीच्या  परीक्षांची तयारी सुरू..!

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२१ च्या दहावी आणि बारावीच्या  परीक्षांची तयारी सुरू केली आहे. मंडळाच्या पोर्टलद्वारे शाळांनी विद्यार्थ्यांचा डेटा ऑनलाइन भरण्यास सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पणजी : गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२१ च्या दहावी आणि बारावीच्या  परीक्षांची तयारी सुरू केली आहे. मंडळाच्या पोर्टलद्वारे शाळांनी विद्यार्थ्यांचा डेटा ऑनलाइन भरण्यास सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

20 डिसेंबर 2020 पर्यंत सर्व विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती ऑनलाईन सादर करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आदेश संस्थांच्या प्रमुखांना दिले आहेत, असे बोर्डाने एका परिपत्रकात सांगितले. ऑनलाईन माहिती सादर करण्यात काही अडचणी येऊ नयेत, याकरिता बोर्डाने एक सहाय्य पथकदेखील नेमले आहे.

संबंधित बातम्या