राज्‍यात कोरोनाग्रस्‍तांचा आकडा ३९

dainik gomantak
मंगळवार, 19 मे 2020

आज सापडलेल्‍या ८ रूग्‍णांमधील ४ जण दिल्‍ली येथून रेल्‍वेने आलेले लोक आहेत. यातील ३ लोक महाराष्‍ट्रातून आणि एकजण बंगालमधून आलेला आहे.

पणजी,

सोमवारी ३१ असणारा कोरोनाग्रस्‍तांचा आकडा आजच्‍या दिवशी ३९ वर पोहचला आहे. आरोग्‍य खात्‍याने दिलेल्‍या माहितीनुसार अद्याप ८ जणांचे अहवाल येणे बाकी आहे. दरम्‍यान राज्‍यात टाळेबंदी कडक करणे आवश्‍‍यक झाले आहे. 
आज सापडलेल्‍या ८ रूग्‍णांमधील ४ जण दिल्‍ली येथून रेल्‍वेने आलेले लोक आहेत. यातील ३ लोक महाराष्‍ट्रातून आणि एकजण बंगालमधून आलेला आहे. सध्‍या या सर्व रूग्‍णांना मडागाव येथील इएसआय रूग्‍णालयात ठेवण्‍यात आले आहे. या रूग्‍णांची तब्‍येत स्‍थिर असल्‍याची माहिती आरोग्‍य खात्‍याने दिली.

संबंधित बातम्या