राज्यात एक लाख सदस्य नोंदणी लवकरच: अनिल होबळे

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

राज्यात भंडारी समाजाचे पाच लाख लोक आहेत. त्यामुळे बाराही तालुक्यांतून किमान एक लाख सदस्य होणे आवश्‍यक आहे, त्यासाठी आम्ही सदस्य नोंदणीस लवकरच प्रारंभ करणार आहोत, अशी माहिती अनिल होबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पणजी : राज्यात भंडारी समाजाचे पाच लाख लोक आहेत. त्यामुळे बाराही तालुक्यांतून किमान एक लाख सदस्य होणे आवश्‍यक आहे, त्यासाठी आम्ही सदस्य नोंदणीस लवकरच प्रारंभ करणार आहोत, अशी माहिती अनिल होबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  

होबळे म्हणाले, की आम्ही बारा तालुक्यांत संघटनेचे सदस्य करून घेणार आहोत. राज्यातील पाच लाखांपैकी किमान एक लाख सदस्य करण्याचे निश्‍चित केले आहे. या सदस्यत्वासाठी आम्ही शंभर रुपये आकारणार आहोत. सदस्य झाल्यानंतरच संघटनेची निवडणूक व्हावी. त्याचबरोबर संघटनेची पाच हजार चौरस मीटर जागा आहे. समाजाची लोकसंख्या लक्षात घेता पर्वरीसारख्या ठिकाणी एक सभागृह व्हावे, अशी आपली इच्छा आहे. त्यात कोणाचाही श्रेयवाद आड येऊ नये. भंडारी समाजाची जी संघटना नोंदीत झाली ती एज्युकेशन हब म्हणून झाली आहे.

तत्कालीन मंत्र्यांनी या संघटनेला एक कोटी रुपये मंजूर केले होते, परंतु अजूनही ती रक्कम संघटनेला का मिळाली नाही ती माहिती नाही.  पर्वरी येथील जागा संघटनेला मिळायलाच हवी, आम्ही ती जागा परत घेण्यासाठी प्रयत्न करू असे सांगून होबळे म्हणाले की, बाराही तालुक्यात भंडारी समाजाची संघटना आहे. त्या संघटनेकडे जाऊन समाजातील लोकांनी सदस्यत्वाचा अर्ज भरावा. मागील निवडणुकीवर आपण आक्षेप घेतला होता, त्यावर उपजिल्हाधिकारी न्याय देणार आहेत.

संबंधित बातम्या