राज्यात प्लाझ्मा बँक होणार

state will have plasma bank
state will have plasma bank

पणजी, 

राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी आता आरोग्य खाते प्लाझ्मा बँक स्थापन करणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री विश्वजित राणे आज दिली. यावेळी त्यांच्यासोबत गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवानंद बांदेकर उपस्थित होते.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी आरोग्य खाते नेहमीच लोकांच्या सोबत आहे. केंद्रीय आरोग्य खात्याकडून दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत आम्ही राज्यात अनेक प्रकारच्या उपाययोजना राबवीत आहोत. त्यातीलच एक उपाययोजना म्हणजे प्लाझ्मा बँक आहे. यासाठी स्वतंत्र तंत्रज्ञान आमच्याकडे उपलब्ध आहे, ज्यामध्ये अद्ययावत फ्रीझरचाही समावेश आहे. गोमेकॉमधील रक्तपेढीही सर्वतोपरी मदत करणार आहे. 
कोव्हीड रुग्णांसाठी प्लाझ्मा उपचार ही प्रणाली अँटीबॉडी ट्रीटमेंट उपचारप्रणाली उपयोगी ठरू शकते. जे लोक कोरोनमुक्त झाले आहेत त्यांनी पुढे यावे आणि प्लाझ्मा डोनेट करावा जेणेकरून गंभीर अवस्थेत असणाऱ्या रुग्णांची प्रकृती सुधारण्यासाठी मदत होईल, असेही यावेळी सांगण्यात आले. दरम्यान १८ ते ६० वर्षांची व्यक्ती जी पूर्णपणे कोव्हीडमधून बरी झाली आहे, ती आपला प्लाझ्मा डोनेट करू शकते. तसेच आम्ही आता आयसीएमआरलाही यासंदर्भात अधिक अभ्यास करण्यासाठीचे पत्र लिहिणार असल्याची माहिती डॉ. बांदेकर यांनी दिली.

चाचण्या वाढविणार
दरम्यान, राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले, तरी आम्ही लोकांची साथ कोणत्याही प्रकारे सोडलेली नाही. आम्ही केरळ आरोग्य खात्याच्या संपर्कात असून त्यांनी कोणत्या पद्धतीने काम केले आहे, याचा बारीक अभ्यास करीत आहोत. आम्ही आमच्या डॉक्टरांनाही केरळ येथे कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांशी बोलण्यास सांगितले आहे. जेणेकरून एक कार्याची दिशा ठरविण्यास आम्हाला मदत होईल. सध्या आमचा भर अधिकाधिक पडताळणी चाचण्या वाढविण्यावर राहणार आहे. सरकार ज्या गोष्टी करीत आहे, त्या गोष्टींसोबत आपण सर्वांनी सकारात्मक पद्धतीने उभे राहणे आवश्यक आहे, असेही मंत्री राणे यावेळी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com