विरोधक कोण याचा मला कधीच फरक पडला नाही: बाबुश मोन्सेरात

बाबुश मोन्सेरात यांनी प्रचाराला सुरवात केली असून; बॉक द व्हाक परिसरातील प्रचारा दरम्यान ते बोलत होते
विरोधक कोण याचा मला कधीच फरक पडला नाही: बाबुश मोन्सेरात
Utpal Parrikar And Babush MonserratDainik Gomantak

पणजी: विधानसभा निवडणुका जश्या जवळ येतील तसं राज्यातील राजकीय वातावरण तापत आहे. अवघ्या काही दिवसांवर निवडणून येऊन ठेपली असताना देखील राजकीय नेत्यांचे पक्षांतर चालूच आहे. गेले काही दिवस बाबुश मोन्सेरात आणि उत्पल पर्रीकर यांच्यातील अप्रत्यक्ष राजकारण हा राज्यातील चर्चेचा मुद्दा बनला आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी पर्रीकरांच्या अपक्ष निवडणूक लढणार या भूमिकेवर मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा फारसा फरक पडला नाही.(Statement by Babush Monserrat about utpal parrikar)

Utpal Parrikar And Babush Monserrat
कळंगुटमधून सिक्वेरा भाजपाचे उमेदवार, तृणमूल काँग्रेसला राजीनामा

बाबुश मोन्सेरात यांनी प्रचाराला सुरवात केली असून बॉक द व्हाक परिसरातील प्रचारा दरम्यान त्यांना प्रश्न करण्यात विरोधात उत्पल पर्रीकर आहेत यावर त्यांची भूमिका विचारली असता मला "माझ्यासमोर कोण विरोधक आहे याचा फारसा फरक पडत नाही किंबहुना मी त्याची पर्वाच करत नाही, मी नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतो. नेहमीच मी माझ्या मतदारसंघातील नागरिकांच्या संपर्कात असतो. त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना तत्काळ मदत करतो यामुळे माझे मतदारच मला जिंकवण्यासाठी मदत करतील असे मत बाबुश मोन्सेरात यांनी मांडले ते पुढे म्हणाले, मी इतकी वर्षे सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने मी नक्की कसा आहे हे जनतेला ठाऊक आहे. जनतेचा माझ्यावर विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान त्यांच्यासोबत पणजी महानगरपालिकेच्या नगरसेवक दीक्षा माईणकर तसेच भाजपचे कार्यकर्ते हजर होते.

Utpal Parrikar And Babush Monserrat
'या' दोन उमेदवारांनी केले अर्ज दाखल

अखेर उत्पल पर्रीकर यांची या अटीवर माघार?

" मी माघार घ्यायला तयार आहे; परंतु पणजी मतदारसंघातील (Panajim Constituency) उमेदवार बदला, स्वर्गीय मनोहर पर्रीकर ज्या मतदार संघातून तब्बल पाच वेळा निवडून आले त्या मतदारसंघात एक गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेला तसेच स्वच्छ चारित्र्य असणारा उमेदवार भाजपने द्यावा, असा पर्याय पर्रीकरांनी भाजप समोर ठेवला आहे."

उत्पल यांनी पुन्हा भाजपत यावं

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) गोव्याचे प्रभारी सरचिटणीस सी टी रवी यांनी उत्पल पर्रीकर यांना विधानसभा निवडणूक लढवण्याच्या आणि भगव्या पक्षात पुन्हा प्रवेश करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे.

मात्र उत्पल पर्रीकरांनी Utpal Parrikar अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. राज्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीसपासून ते जे.पी नड्डा J.P. Nadda यांच्या पर्यंन्त सर्वानी पर्रीकरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पर्रीकर अद्याप आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. आज संध्याकाळपर्यंत भाजप उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होणार आहे. दरम्यान पर्रीकरांचे मतपरिवर्तन करण्यात भाजपचे नेते यशस्वी होतील का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.