राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी काणकोण प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन

राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने एका निवेदनाद्वारे काणकोणचे उपजिल्हाधिकारी रमेश गावकर यांना 29 जुलै रोजी दिले आहे.
Goa Latest News
Goa Latest News Dainik Gomantak

आगोंद : राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने एका निवेदनाद्वारे काणकोणचे उपजिल्हाधिकारी रमेश गावकर यांना 29 जुलै रोजी दिले आहे.

यावेळी समितीचे सर्वश्री.प्रदीप पैंगीणकर, रामानंद प्रभु, गोविंद लोलयेकर, चंद्रकांत कोमरपंत ज्योती पैंगीणकर आणि हिंदुत्ववादी व भारत माताकी जय संघटनेचे सतीश भट यांची उपस्थिती होती.

Goa Latest News
Goa Crime : शापोरात आढळला विदेशी व्यक्तीचा मृतदेह

या सर्वांनी उपजिल्हाधिकारी रमेश गावकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी उपजिल्हाधिकारी गावकर यांनी "आपण राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, या दृष्टीने आवश्यक ती योग्य पावले उचलणार आहे. आपले हे कार्य स्तुत्य असेच असणार असल्याचे सांगितले."

या निवेदनात बंदी घालण्यात येऊनही दुकानात व रस्त्यावर विक्री केले जाणारे प्लास्टिकचे ध्वज व राष्ट्रीय सणानंतर त्यांची होणारी विटंबना याविषयीही सविस्तर माहिती गोविंद लोणीकर यांनी दिली.

यंदा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 जुलै ते 15 जुलै या दिवसात "घरोघरी तिरंगा" हा उपक्रम शासनातर्फे राबविण्यात येणार असून त्या दृष्टीने ध्वजाचा अवमान होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे,असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

या उद्देशाने काणकोणच्या श्री मल्लिकार्जुन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज कामत यांनाही निवेदन देण्यात आले आहे. तसेच बलराम निवासी माध्यमिक शाळा आमोणे, श्री मल्लिकार्जुन विद्यालय चाररस्ता, काणकोण या शाळांच्या मुख्याध्यापकांनाही निवेदने देण्यात आली आहेत. अध्यापक व सर्व स्वाभिमानी व्यक्तीनी आपण या दृष्टीने विद्यार्थ्यांचे प्रबोधन करणार, असे या शिष्ट- मंडळाला सांगितले. अशी माहिती गोविंद लोलेकर यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com