राज्यांमध्ये 15 जानेवारीपर्यंत रोड शो-पदयात्रेवर बंदी, रात्री 8 पासून प्रचार कर्फ्यू

विधानसभा निवडणुका सात टप्प्यात होणार आहेत
Election Curfew
Election CurfewDainik Gomantak

उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या अंतर्गत निवडणूक आयोगाने अनेक महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. याअंतर्गत पाच राज्यांमध्ये रोड शो, पदयात्रा, सायकल किंवा वाहन रॅलीवर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत प्रचार संचारबंदी (Curfew) लागू राहणार आहे. ही बंदी 15 जानेवारीपर्यंत लागू राहणार आहे.

Election Curfew
Assembly Election 2022 : राज्यात 14 फेब्रुवारीला होणार मतदान, मतमोजणी 10 मार्चला

निवडणूक आयोगाने (Election Commission) मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत

माहितीनुसार, मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी सांगितले की, 15 जानेवारीपर्यंत पाच राज्यांमध्ये रॅली, रोड शो आदींना परवानगी दिली जाणार नाही. कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा उमेदवाराला प्रत्यक्ष निवडणूक (Election) रॅली काढण्याची परवानगी दिली जाणार नाही. पथसंचलनही करता येणार नाही. याशिवाय निवडणूक जिंकल्यानंतरही मिरवणूक काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. घरोघरी प्रचारासाठी केवळ 5 जण जाऊ शकतात. 15 जानेवारीनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन निवडणूक आयोग निर्णय घेईल.

Election Curfew
आचारसंहिता लागू होताच अनेक बदल, निवडणूक आयोग महाबली

विधानसभा निवडणुका सात टप्प्यात होणार आहेत

पाच राज्यांमध्ये सात टप्प्यात विधानसभा निवडणुका (Assembly Election) होणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये 10 फेब्रुवारीला पहिल्या फेरीचे मतदान होणार आहे. दुसरा टप्पा 14 फेब्रुवारी, तिसरा टप्पा 20 फेब्रुवारी, चौथा टप्पा 23 फेब्रुवारी, पाचवा टप्पा 27 फेब्रुवारी, सहावा टप्पा 3 मार्च आणि शेवटचा टप्पा 7 मार्चला होणार आहे. 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहेत. पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात (goa) 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्याचबरोबर मणिपूरमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. येथे पहिल्या फेरीचे मतदान 27 फेब्रुवारीला आणि शेवटची फेरी 3 मार्च रोजी होणार आहे. 10 मार्च रोजी सर्व राज्यांमध्ये मतमोजणी होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com