सकारात्मक विचारांनी कोरोनापासून दूर राहा

प्रदीप घाटगे
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

कोरोनासाठीचा काढा, आर्सेनिक अल्बम ३० किंवा इतर कुठलेही औषधे घेऊ नयेत. डॉक्‍टरांनी जी सप्लिमेंट दिली आहेत तीच यावीत, स्वतः किंवा दुसऱ्या कुणाचे सांगण्यावरून अशी औषधे घेऊ नयेत.

कोरोनासाठीचा काढा, आर्सेनिक अल्बम ३० किंवा इतर कुठलेही औषधे घेऊ नयेत. डॉक्‍टरांनी जी सप्लिमेंट दिली आहेत तीच यावीत, स्वतः किंवा दुसऱ्या कुणाचे सांगण्यावरून अशी औषधे घेऊ नयेत. जरूर वाटल्यास थोडेसे गरम पाण्यात हळद टाकून प्यायले तर चालू शकते.

सुदृढ माता व बेबी राहण्यासाठी फळे, भाजीपाला, ताजे व शिजवलेले जेवण, खाणे-पिणे रोजच्या प्रमाणे घ्यावे, बाहेरचे काही खाऊ नये, फास्टफूड तर अजिबात खाऊ नये. नवीन लग्न झालेल्याबद्दल त्यांनी सांगितले, की जर नवरा किंवा पत्नी कोरोनाबाधित असेल तर शक्‍यतो गर्भधारणा टाळावी, दोघेही निगेटिव्ह असतील तर नैसर्गिकरीत्या गर्भधारणा करण्यास हरकत नाही. कोरोना विषाणू हा काही सेक्‍सउल ट्रान्समिशनमधून होणारा रोग नाही. तसेच एच.आय.व्ही. रुग्ण असेल तर त्याला कोरोना होण्याची दाट शक्‍यता असते. कारण मुळातच त्याची रोगप्रतिकारकशक्ती कमी असते. कुणाला न्यूमोनिया झाला असेल म्हणजे त्याला कोरोना झाला असे म्हणता येत नाही, पण कोरोनामुळे न्यूमोनिया होतो, तसेच इतर आजारामुळेसुद्धा न्यूमोनिया होतो. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही.

बाळ, बाळंतिणीची काळजी कशी घ्यावी : 
बाळंतीण स्त्रिया व बाळांबद्दल बोलताना डॉ. सहस्रबुद्घे यांनी कोरोना होऊ नये यासाठी याच गोष्टींवर भर दिला व दवाखान्यातून घरी गेल्यानंतरही ज्या गोष्टी डॉक्‍टरांनी सांगितल्या आहेत, त्याप्रमाणे कराव्यात व सांगितलेलीच औषधे घ्यावीत, बाळंतपणानंतर घरी स्वच्छतेला फार प्राधान्य दिले पाहिजे, अस्वच्छतेमुळे बाळंतीण व बाळाला कसलाही संसर्ग होणार नाही, तसेच इतर स्त्रियांपासून काही लागण होणार नाही, याची दक्षता घेण्याची गरज आहे, शक्‍यतो बाहेरच्या महिलांना बाळाला घेण्यास देऊ नये, घरच्या स्त्रियांनी बाळाला घेण्यास हरकत नाही. जर ते कोरोनाबाधित नसतील तर तसेच स्त्रियांनी योग्य ती काळजी घेऊनच बाळाला घ्यावे. आईने जर ती कोरोनाबाधित नसेल तरच अंगावरचे दूध बाळाला पाजावे, म्हणजे ते पुरेसे होते व बाळाची रोगप्रतिकारकशक्ती वाढते, जर मातेला कोरोना असेल तर दूध एक्‍स्प्रेस पद्धतीने वाटीत काढून घ्यावे व बाळाला द्यावे. 

दुधातून कुठलाही संसर्ग किंवा धोका होत नाही : 
आई जर कोरोनाबाधित म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर बाळाची टेस्ट करून घ्यावी. बाळ कसेही असूदे त्याला अंघोळ नेहमीच्या पद्धतीने घरी घालावी, दवाखान्यात फक्त पुसून व स्वच्छ करून बाळाला देतात.

बाळाला ज्या काही लस करावयाच्या असतील त्या वेळेनुसार घ्याव्यात, त्याचा या काळात बाळाला उपयोग होतो. आईला जर सर्दी, खोकला काही झाले असेल तर तिने मास्क व बाकीची काळजी घेऊन बाळाला जवळ घ्यावे, अगोदर सांगितल्याप्रमाणे बेसिक काळजी म्हणजे मास्क, हात धुणे, शक्‍य असेल तर फेस शिल्ड वापरावे. जेणेकरून ड्रोपलेट्‌स, शिंतोडे उडाल्याने बाळाला त्याची लागण होणार नाही. बाळंतीण बाईने शक्‍यतो गरम पाणी प्यावे, सकस आहार घ्यावा व भरपूर विश्रांती घ्यावी. पाच वर्षांखालील मुलांना खेळू द्यावे, घरात खेळताना मास्कची गरज नाही. बाहेर घेऊन जाताना मात्र त्यांनी मास्क घालावा. 

बाळाला दवाखान्यात घेऊन जायचे असेल तर मातेने स्वतःला पुरेपूर झाकून घ्यावे, मास्क लावावे व बाळाला व्यवस्थित कापडात ठेवून न्यावे. दवाखान्यात जाणे शक्‍य नसेल तर आई डॉक्‍टरांना फोनवर बोलूनही औषधे घेऊ शकते (टेलि मेडिसीन) कारण रुटीन औषधे असतात ती घेण्यास काही अडचण नसते. जर दवाखान्यात गेले व परत घरी आल्यावर बाथरूममध्ये जाऊन स्वच्छ होणे व कपडे बदलणे आवश्‍यक आहे.

ज्यांना सर्दी, खोकला, ताप इत्यादी आहे अथवा वयस्क व आजारी लोकांनाही बाळाजवळ येऊ देऊ नये. मातेने जेव्हा जरूर वाटेल तेव्हा वाफ घेणेस हरकत नाही. या चर्चेचा गाभा असा होता, की कोरोना हा घातक किंवा आपल्याला घरात येऊन मारणार नाही. आपण घरात राहून सर्वपरीने, मास्क वापरणे, हात साबणाने वारंवार धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे व योग्य ती काळजी घेतली तर आपणास काहीही होत नाही.  स्त्रियांनी नेहमी सकारात्मक राहून आपल्या डोक्‍यातून कोविड/ कोरोना हद्दपार करावा, कोरोनाच्या बातम्या, चर्चांपासून अलिप्त राहावे, सकारात्मक वातावरण निर्माण करणे, घरातील सर्वांवर लक्ष ठेवणे, घर स्वच्छ ठेवणे, कपडे स्वच्छ ठेवणे, बाळाचे कपडे रोज नवीन धुतलेली वापरणे इत्यादी गोष्टी काळजीपूर्वक कराव्यात. मग कुणालाच कोरोना काय, दुसरा कोणताही आजार होणार नाही. जर जरूर वाटली किंवा काही लक्षणे दिसत असल्यास लगेच डॉक्‍टरांना फोन करावा.

संबंधित बातम्या