Yuvraj Singh च्या गोव्यातील घरात राहायची संधी; भाडं ऐकून व्हाल थक्क

फक्त सहा जणांसाठी मिळेल राहायची संधी
Yuvraj Singh
Yuvraj SinghDainik Gomantak

भारतीय अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचे (Yuvraj Singh) गोव्यात अलिशान घर आहे. युवराजचे हे घर आता सर्वसामान्य नागरिक आणि पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. अतिशय सुंदर इंटेरिअर असलेले हे घर गोव्यातील मोरजी (Morjim, Goa) येथील निसर्गरम्य परिसरात वसलेले आहे. 'कासा सिंग' असे युवराज सिंगच्या या अलिशान घराचे नाव असून, सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडेल एवढ्या दरात ते राहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Yuvraj Singh
Yuvraj SinghDainik Gomantak
Yuvraj Singh
सिक्सर किंग युवराज सिंग टी-२०मध्ये करणार पुनरागमन

हिरवागार मोरजीचा टेकडी परिसर आणि समोर दिसणारा निळाशार अरबी समुद्र (Arabian Sea) युवराजच्या अलिशान घराला खऱ्याअर्थानं सिलेब्रिटी होम बनवतात. आता हे घर सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होणार असल्याने इतरांना देखील सिलेब्रिटी लाईफस्टाईल अनुभवता येणार आहे. क्रिकेट विश्वातून निवृत्त झालेला युवराज आपल्या कुटुंबियांसोबतचा खास वेळ याच घरात घालवतो असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. युवराज सिंगने एअर बीएनबी (AIRBNB) सोबत एकत्र येत गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी यासाठी एक खास ऑफर उपलब्ध करून दिली आहे.

Yuvraj Singh
Cricketers: तुम्हाला माहितीये का? निवृत्तीनंतर हे 5 खेळाडू पुन्हा मैदानात परतले होते

काय आहे युवराजच्या घराची ऑफर

'सहा जणांसाठी एकच मुक्काम' अशी या घराची ऑफर आहे. 14 ते 16 ऑक्टोबर 2022 या कालावधीत भाग्यवान सहा जणांना युवराजच्या या घरात राहता येईल. यासाठी 1,212 रुपये प्रति रात्र असा दर निश्चित करण्यात आला आहे. 12 हा युवराजचा वाढदिवस तसेच जर्सीचा नंबर आहे. घरासाठी 28 सप्टेंबरपासून बुकिंग सुरू होणार आहे. http://airbnb.com/yuvrajsingh या लिंकवरून घरासाठी बुकिंग करता येईल.

युवराज सिंगने याबाबत इंस्टाग्राम पोस्ट तसेच स्टोरी शेअर केली आहे. तसेच, आपल्या गोव्यातील अलिशान घराचे फोटो शेअर केले आहेत. युवराजच्या चाहत्यांनी या पोस्टवर हजारो कमेन्टस् आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी युवराजच्या घरात राहण्याच्या या नामी संधीचा लाभ घेण्याची ईच्छा व्यक्त केली आहे. अनेकजण 28 ऑगस्टला या बुकिंग सुरू होण्याच्या प्रतिक्षित आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com