गोव्यातून कर्नाटकमध्ये जाणारी दारू मोले नाक्यावर जप्त

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

गोव्यातून कर्नाटकमध्ये नेली जाणारी साडेपाच लाख रुपये किमतीची दारू आज मोले तपासणी नाक्यावर पकडण्यात आली. एका ट्रकमध्ये दडवून ही दारू कर्नाटक मध्ये नेली जात होती.

पणजी: गोव्यातून कर्नाटकमध्ये नेली जाणारी साडेपाच लाख रुपये किमतीची दारू आज मोले तपासणी नाक्यावर पकडण्यात आली. एका ट्रकमध्ये दडवून ही दारू कर्नाटक मध्ये नेली जात होती. गोव्यातून कर्नाटककडे जाण्यासाठी मोले तपासणी नाके मार्गे अनमोड घाट रस्ता आहे. या रस्त्याचा वापर करून या दारूची तस्करी करण्यात येत होती. ट्रकमधून अशी दारू नेली जाणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यावर त्या ट्रकची अबकारी खात्याने तपासणी केली.

यावेळी ट्रकमध्ये दडवलेली साडेपाच लाख रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली. ही भारतीय बनावटीची विदेशी दारू आहे. गोव्यातून महाराष्ट्रात जाणाऱ्या दारूवर पत्रादेवी तपासणी नाक्यावर सातत्याने कारवाई केली जाते. दारु जप्त केली जाते. मात्र गेल्या काही महिन्यात प्रथमच मोले येथील तपासणी नाक्यावर ही कारवाई झाली आहे.

गोवा राज्यातील 14 अपघातप्रवण क्षेत्रात सुधारणा -

संबंधित बातम्या