Canacona : लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना थांबा द्या, अन्यथा...

काणकोणवासीयांचा तीव्र आंदोलन छेडण्याचा प्रशासनाला इशारा
Canacona People | Canacona train issue
Canacona People | Canacona train issueDainik Gomantak

Canacona train issue : काणकोणवासीयांनी अनेक वेळा मागणी करूनही लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या काणकोण रेल्वे स्थानकात थांबत नाहीत यासाठी १३ जानेवारीपासून तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार काणकोण रेल्वे थांबा बचाव कृती समितीने आज झालेल्या बैठकीत केला आहे.

या संदर्भात चर्चा करण्यासाठी स्वाभिमानी जागृत काणकोणकार, जेष्ठ नागरिक मंच, जनसेना वॉरियर्स व समविचारी संस्थेच्या सदस्यांची आज बैठक संध्याकाळी घेण्यात आली. रेल्वे प्रशासनाने नागरिकांच्या भावनांची कदर न केल्यास काणकोण बंद आंदोलन पुकारण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Canacona People | Canacona train issue
Sanjivini Sugar Factory: संजीवनीच्या जमिनीवर सरकारातील प्रॉपर्टी डिलरांचा डोळा; विजय सरदेसाई

कृती समितीचे समन्वयक जनार्दन एस. भंडारी यांनी काणकोण रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्याची येथील नागरिकांची दीर्घकाळाची प्रलंबित मागणी असून रेल्वे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी त्या मागणीकडे आजपर्यंत दुर्लक्ष करत आहेत. त्यासाठी त्यांना जाग आणण्यासाठी आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय राहिला नसल्याचे सांगितले.

आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास किंवा आंदोलनादरम्यान ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवल्यास त्याला केवळ सरकार जबाबदार असेल असेही त्यांनी सांगितले.

Canacona People | Canacona train issue
Miramar : पर्यटकांना पोलिसांचा दणका; बसचालकालाही ठोठावला दंड

काणकोणच्या जेष्ठ नागरिकांनी ही समस्या सरकाराच्या निदर्शनास आणण्यासाठी सर्व प्राधिकरणांना पत्रव्यवहार केला आहे आणि काणकोणच्या लोकांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबविण्याची विनंती केली आहे, परंतु त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे असे जेष्ठ नागरिक शांताजी नाईक गावकर यांनी सांगितले.

या पूर्वी १५ डिसेंबरला काणकोण रेल्वे स्थानकावर निषेध मोर्चा नेण्यात आला आणि निवेदनात नमूद केलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

जवळपास एक महिना उलटून गेला तरी आज पर्यंत त्यादृष्टीने काहीही झालेले नाही. ४ डिसेंबरला पून्हा रेल्वे अधिकाऱ्यांना स्मरण पत्र व निवेदन देण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com