पिसुर्लेत खनिज वाहतूक रोखली

Padmakar Kelkar
बुधवार, 29 जुलै 2020

पिसुर्ले - सत्तरी येथे काल चक्क लोकवस्तीतून बेकायदेशारपणे खनिज वाहतूक करणारे ट्रक अडवून पुन्हा खनिज माल खाणींवर पाठविण्यात आला.

वाळपई

नागरिक हनुमंत परब यांनी याकामी पुढाकार घेऊन खनिज वाहतूक करीत असलेले जवळपास २७ ट्रक माघारी पाठविले, पण चार ट्रकचालकांनी चोरट्या वाटेने माल नेला आहे. यावेळी खनिज वाहतुकदार व नागरिक अशा दोन गटात बरीच शाब्दीक चकमक झाली.
काही दिवसांपूर्वी पिसुर्ले खनिज परिसराची पाहणी खाण खाते, उपजिल्हाधिकारी, पिसुर्ले शेतकरी संघटनेचे प्रमुख हनुमंत परब यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती. त्यावेळी पाहणीवेळी बेकायदेशीरपणे खनिज उत्खनन, खनिज वाहतूक झाल्याचे आढळून आले होते. पिसुर्ले शेतकरी संघटनेने उच्च न्यायालयात आपल्या मागण्या घेऊन याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार ही पाहणी करण्यात आली होती. तसेच खाण पिठातील खंदकातील पावसाने बरेच पाणी तुंबले आहे. हे पाणी उपसणे आवश्यक आहे. त्याकडे खनिज कंपनीने दुर्लक्ष केल्याचे परब यांचे म्हणणे आहे.
भरवस्तीतून वाहतूक करीत असल्याने काल पिसुर्लेत खनिज वाहतूकीचे ट्रक अडविण्यात आले. यावेळी पेलिसांनाही पाचरण करण्यात आले. पिसुर्लेतून कोणत्याही स्थितीत वाहतूक होणार नाही अशी कडक भूमिका हनुमंत परब यांनी घेतली.

संपादन - यशवंत पाटील

संबंधित बातम्या