कालेला वादळाचा मोठा तडाखा

Dainik Gomantak
सोमवार, 18 मे 2020

वादळात पोकरमळ काले भाग वगळता अन्य ठिकाणी त्याचा काहीही परिणाम जाणवला नाही किंवा पाऊसही पडला नाही.

कुडचडे

पोकरमळ काले भागात वादळी पावसाने तडाका दिल्याने अनेकांना फटका बसला असून काहींच्या छप्पराची कौले, पत्रे उडाली तर अनेकांच्या परसबागेतील केळी, पोफळी, माड, काजूची हानी झाल्याची माहिती मिळाली आहे. संध्याकाळी साडेतीनच्या सुमारास आलेल्या वादळी वारा अन पावसाने मोडतोड केली असली तरी सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही. दर वर्षी पोकरमळ भागात अश्याच प्रकारे वादळीवाऱ्याने नागरिकांना नुकसानी सोसावी लागत असते. काहींच्या घरावरील पाण्याची टाकी वादळ वाऱ्या सोबत उडून गेली. गुरांच्या गोठ्यांनाही नुकसानीची झळ पोचली. 

वादळात पोकरमळ काले भाग वगळता अन्य ठिकाणी त्याचा काहीही परिणाम जाणवला नाही किंवा पाऊसही पडला नाही. काहींच्या घराची कौले, सिमेंट पत्रे वाऱ्या सोबत खाली पडून नुकसानि झाली तर घरात पावसाचे पाणी पडल्याने सामानाची नुकसान झाले बबिता जानू बावदाने या गरीब महिलेने तीन दिवसापूर्वीच काबाडकष्ट करून आपल्या घरावर साधें पत्रे  घालून छप्पराची शाकारणी केली होती. आजच्या वादळाने सर्व पत्रे पिळवटून टाकल्याने तिला संकटाला तोंड द्यावे लागलें आहे या बद्दल लोकांनी हळहळ व्यक्त केली. अनेकांच्या छप्परावरील सिमेंट पत्रे फुटून घर उघडे पडले. 

पडझड होऊन गेल्या नंतर स्थानिक युवकांनी एकमेकांना सहकार्य करून छप्पर झाकण्याचा प्रयत्न केला. कित्येकांना दर वर्षी परस बागेतील नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. यंदाही केळी, पपया, पोफळी, काजूची, माड  हानी झाली आहे. या सर्व घटनेत बाबलो खरात, लकी खरात, जानू खरात, दामू खरात, विठू डोईफोडे, बबिता जानू बावदाने, सरिता ताटे, रामू जांगळे, नाऊ शेळके, सखू शेळके, जानू शेळके, चिमणो शेळके, जानू बोंबो शेळके व इतरांना वादळाचा फटका बसला.

 

 

संबंधित बातम्या

Tags