Goa: बोली भाषेतील नजाकत जपायला हवी!

पेडणे येथे नुकतेच 'लेखक आपल्या भेटीला' उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Kavyavachan
Kavyavachan Dainik Gomantak

Pernem: येथील संत सोहिरोबानाथ आंबिये, शासकीय कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे नुकतेच ‘लेखक आपल्या भेटीला’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोमंतकीय साहित्यिक दयाराम पाडलोस्कर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी बोली भाषेतून कथाकथन आणि काव्यवाचन केले.

बोली भाषेतील मौखिक गीते, त्यातील दुर्मीळ असे शब्द लोप पावत चालले आहेत, त्यांना आपल्या साहित्यातून जीवंत ठेवले पाहिजे, असे मत त्‍यांनी व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. नीता तोरणे उपस्थित होत्या.

Kavyavachan
Pratika Marathe : भरतनाट्यम क्षेत्रातला उगवता गोमंतकीय तारा

कार्यक्रम दोन सत्रांत झाला. पाडलोस्करांनी ‘तीला वाचवायला हवे’ हे कथाकथन केले. दुसऱ्या सत्रात त्यांनी हीरीरी पापरी, पालखी यासारख्या त्यांच्या बोली भाषेतील कविता सादर केल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्ष कला शाखेच्या रणजीता शेणवी देसाई यांनी केले. पाहुण्यांची ओळख इश्रा खान हीने केली. भाग्यश्री गवस हीने आभार मानले. दुसऱ्या सत्रात पाहुण्यांचा परिचय किशोरी धारगळकर हिने करून दिला; तर श्रद्धा गावडे हिने आभार मानले. यावेळी कार्यक्रमाला मराठी विभागाचे प्राध्यापक आनंद कोळंबकर, प्रा. सचिन वेटे, प्रा. नवसो परब, प्रा, अंजली नाईक, प्रा. उगम परब, प्रा. केतकी वझे उपस्थित होत्‍या.

Kavyavachan
Goa Congress Rebel : बोडगेश्‍वर महाराजा... खोटी शपथ घेणाऱ्यांना शिक्षा कर!

साहित्‍यिकांची ओळख महत्त्वाची: महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांच्या भागातील साहित्यिकांची व त्यांच्या साहित्याची ओळख करून देणे हा या उपक्रमामागील हेतू आहे, असे मत यावेळी प्राध्यापक डॉ. नीता तोरणे यांनी व्यक्त केले. मराठी विभागातर्फे पदवी तसेच पदव्‍युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविले जातात, अशीही माहिती त्‍यांनी यावेळी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com