गोवा सरकारकडून नागरी स्वातंत्र्यांची गळचेपी; विरोधकांचा घणाघात

MADGON 3.jpg
MADGON 3.jpg

मडगाव: 75 वर्षांपूर्वी पोर्तुगीजांची (Portuguese) सत्ता असताना डॉ. राम मनोहर लोहिया (Dr. Ram Manohar Lohia) यांनी नागरी स्वातंत्र्यासाठी आवाज उठविला आज 75 वर्षांनी तीच परिस्थिती असून सध्या सत्तेवर असलेल्या भाजपने नागरी स्वातंत्र्याची गळचेपी सुरू केली आहे अशी टीका विरोधकांनी 75 व्या क्रांतिदिनी बोलताना केली.

यावेळी बोलताना सरदेसाई म्हणाले, प्रमोद सावंत (Pramod Sawant) सरकारला टीका सोसत नाही. विरोधकांची तोंडे बंद करण्यासाठी हे सरकार कुठल्याही पातळीवर उतरते. त्यामुळे आता नव्याने नागरी स्वातंत्र्यासाठी चळवळ सुरू करण्याची गरज आहे.(Strangulation of civil liberties by the Goa government Opponents throng)

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी या सरकारवर टीका करताना सरकारच्या कोविड गैरव्यवस्थापनामुळे शेकडो लोकांना ऑक्सिजन आणि इतर सुविधा अभावी प्राण गमवावा लागला असा असा आरोप केला.

आपच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिमा कुतीन्हो (Pratima coutinho) यांनी भाजप सरकारच्या या राज्यात कायदा व सुव्यवस्था संपूर्ण कोसळली असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे नवीन सालाझार बनले आहेत अशी टीका केली.  यावेळी आपचे व्हेंझी व्हिएगस तसेच संदेश तळेकर (Sandesh Talekar) हे उपस्थित होते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com