भटकी गुरे, कुत्री यांच्यामुळे सासष्टीत अपघाताचा धोका

सासष्टीतील अनेक रस्त्यावर भटकी गुरे व कुत्री येत असल्यामुळे वाहन चालकांना व पादचाऱ्यांनाही अपघात घडत आहेत.
Stray cattle dogs cause an accident in the salcete
Stray cattle dogs cause an accident in the salcete Dainik Gomantak

सासष्टी : सासष्टीतील अनेक रस्त्यावर भटकी गुरे व कुत्री येत असल्यामुळे वाहन चालकांना व पादचाऱ्यांनाही अपघात घडत आहेत. भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. गत 45 दिवसांत भटकी गुरे, कुत्र्यांमुळे अनेक अपघात झाले आहेत. हल्लीच अपघात घडला असून, यात एकाचा मृत्यू झाला आहे.

Stray cattle dogs cause an accident in the salcete
'सिंगल यूज' प्लास्टिक आरोग्यासाठी धोकादायक?

मडगाव रवींद्र भवन ते कोलवा सर्कल तसेच कोलवा येथे जाणाऱ्या रस्त्यांवर, नावेली, रावणफोंड, चांदर, नुवे परिसरात ही भटकी गुरे व कुत्रे सर्रास रस्त्यावर उभे असतात. रात्रीच्या वेळी गुरांचा अंदाज येत नसल्याने अपघात घडत आहेत.

काही दिवसांपूर्वी भटक्या गुरांमुळे बाणावलीच्या एका युवकाला अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला आहे. बाळ्ळी येथे गुरांमुळे दोन विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली आहे. मडगाव गांधी मार्केट तसेच एसजीपीडीए मार्केटमधील विक्रेते नको असलेली भाजी रस्त्याच्या बाजूला टाकतात हे खाण्यासाठी गुरे रस्त्यावर येतात आणि अपघात घडतात. नगरपालिका, पंचायत यांनी भटक्या गुरांबाबत बंदोबस्त लावावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com