महिनाभरात 233 भटक्या गुरांना मिळाले गोशाळेचे छप्पर

सिकेरीत सोय; वीस ठिकाणच्‍या हॉट-स्पॉटवरून जनावरांची उचल
Stray cattle  महिनाभरात 233 भटक्या गुरांना मिळाले गोशाळेचे छप्पर
Stray cattle महिनाभरात 233 भटक्या गुरांना मिळाले गोशाळेचे छप्पर Dainik Gomantak

पणजी : फोंडा (Ponda) येथे ट्रकच्या धडकेत चार गायींचा (Cow) मृत्यू झाल्याच्या घटनेने भटक्या जनावरांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. गेल्या महिन्यात राज्य सरकारच्या पशुसंवर्धन व पशूवैद्यकीय खात्याने राज्यभरात 20 हॉटस्पॉट तयार करून तेथील भटक्या जनावरांना उचलण्याची जबाबदारी (Stray cattle) राज्यातील गोशाळांकडे सोपवली आहे. गेल्या महिनाभरापासून ही मोहीम सुरू असून आज बुधवारपर्यंत 233 गुरांची सिकेरी-मये येथील गोमंतक गोसेवक महासंघाच्या गोशाळेत रवानगी करण्यात आलीय.

Stray cattle  महिनाभरात 233 भटक्या गुरांना मिळाले गोशाळेचे छप्पर
Goa Rain Updates: राज्यात आजपासून पावसाची विश्रांती

राज्यात पाच नोंदणीकृत गोशाळा आहेत. पण त्यापैकी चार गोशाळांकडे पुरेशा जागेची सोय नाही. दोन्ही जिल्ह्यांत भटक्या जनावरांमुळे अपघात होण्याची संख्या वाढल्याच्या पार्श्‍वभूमीवर पशुसंवर्धन खात्याने प्रत्येक जिल्ह्यात 10 हॉटस्पॉट जाहीर करून तेथून भटक्या जनावरांना उचलण्याची मोहीम गेल्या महिनाभरापासून सुरू केली आहे. त्यासाठी गोशाळांना प्रत्येक जनावरांना उचलून त्यांच्या गोशाळेत नेण्यासाठी दोन हजारांचे अनुदान दिले जात आहे. शिवाय त्यांच्या पोषणासाठी प्रत्येकी प्रतिदिन दीडशे रूपये दिले जातात. राज्यात तब्बल 2500 हून अधिक भटकी जनावरे असल्याची माहिती खात्याकडून देण्यात आली आहे.

राज्यात पाच नोंदणीकृत गोशाळा असल्या तरी त्यापैकी चार गोशाळांकडे आवश्‍यक जागेचा अभाव आहे. त्यामुळे सध्या केवळ सिकेरी-मये (डिचोली) येथील गोमंतक गोसेवक महासंघाच्या गोशाळेत गायींची रवानगी केली जात आहे. त्यांच्याकडे आधीच 1600 गायी असल्याने त्यांच्यावरील ताण वाढला आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागांत गोशाळेचा विस्तार करण्याचे व्यवस्थापनाने ठरविले आहे. फोंडा येथे नुकताच झालेल्या अपघाताच्या घटनेनंतर भटक्या जनावरांचा प्रश्‍न जटील बनला आहे.

Stray cattle  महिनाभरात 233 भटक्या गुरांना मिळाले गोशाळेचे छप्पर
अमित पालेकर यांची प्रकृती खालावली

भटक्या कुत्र्यांचे काय?

भटक्या गायींची गोशाळेत रवानगी करण्याच्या निर्णयामुळे काही प्रमाणात वाहनचालकांना दिलासा मिळाला असला तरी भटक्या कुत्र्यांचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. कुत्रा वाहनासमोर आल्याने अलीकडेच घडलेल्‍या अपघातात फोंडा येथे एका युवकाचा बळी गेला आहे.. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचाही बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. मात्र, यासंदर्भात पशुसंवर्धन खाते स्थानिक स्वराज्य संस्थांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहे.

सरकारच्या आदेशानुसार गेल्या महिनाभरात आमच्या संस्थेने 233 गायींना आसरा दिला आहे. जागेचा प्रश्‍न उद्‍भवत आहे. सर्व तालुक्यांतून जनावरांना सिकेरीत आणणे खर्चिक आहे. त्यासाठी अन्य काही ठिकाणी गोशाळांचा विस्तार केला जात आहे. सध्या संस्थेकडे 1600 गायी आहेत.

- कमलाकांत तारी, गोमंतक गोसेवक महासंघ

आम्ही राज्य सरकारकडे गोशाळांसाठी सरकारी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. केवळ जागेअभावी आम्हाला भटक्या जनावरांना आसरा देता येत नाही. प्रत्येक तालुक्यात हॉटस्पॉट आहेत. त्यामुळे सरकारने तात्काळ ही मागणी मान्य केली पाहिजे.

- हनुमंत परब, श्रीराम गोसंवर्धन नाणूस-वाळपई

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com