Stray Cattle In Goa: सत्तरी तालुक्यात भटक्या गुरांची समस्या जटीलच!

वाहनचालकांना डोकेदुखी; गुरांची रस्त्यावरच ठाण
Stray Cattle In Goa
Stray Cattle In GoaDainik Gomantak

वाळपई: सत्तरी तालुक्यातील विविध भागात दिवसेंदिवस भटक्या गुरांची समस्या जटीलच होत चालली आहे. वाळपई शहरात, ग्रामीण भागात सकाळी, रात्री रस्त्यावर भटका गोवंश आढळून येतो. वेळूस नगरगाव मुख्य रस्त्यावर, रात्रीच्यावेळी कदंब बस स्थानकासमोरील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गोवंश रस्त्यावर बसलेला असतो. अशावेळी वाहनचालकांना त्रासादायक ठरत आहे.

(Stray cattle problem continues in Sattari taluka)

Stray Cattle In Goa
Goa Tourism: पर्यटकांची सतावणूक व लुबाडणाऱ्यांविरोधात तीव्र कारवाई करणार; रोहन खंवटे

वाळपईत मंगळवारच्या आठवडा बाजाराच्या दिवशी ग्राहक व व्यावसायिकांना मोकाटपणे फिरणाऱ्या गुरांचा मोठा त्रास होत आहे. वाळपईत मंगळवारी रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी व्यावसायिक दाटीवाटीने आपापली दुकाने थाटून बसलेले असतात. शहरात दररोज बेवारस गुरांचे प्रमाण वाढलेले आहे. त्याचा मोठा फटका मंगळवारी बाजारादिवशी व्यापाऱ्यांना होतो. भटकी गुरे फळ भाज्यांवर ताव मारतात. परिणामी व्यावसायिकांचा माल खराब होतो.

वाळपई पालिकेने मंगळवारच्या बाजाराच्या दिवशी तरी अशा भटक्या गुरांना या बाजाराच्या जागेत जाता येणार नाही यासाठी उपाय हाती घेतले पाहिजेत, पण त्यावर नियंत्रण आणण्यात वाळपई पालिकेला अपयश येत आहे.

Stray Cattle In Goa
Goa Governor: राज्यपालांहस्ते जुन पर्यंत 850 पेक्षा जास्त गरजू नागरीकांना आर्थिक मदत

एखाद्यावेळी ग्राहकांनी खरेदी केलेल्या कृषी मालावर ही गुरे आक्रमण करीत असतात. परिणामी ग्राहकांनाही नुकसान सोसावे लागते आहे.

भटक्या गुरांमुळे अपघातांत वाढ

वाळपई वेळूस येथे कदंब बसस्थानकासमोर रस्त्यावर दरदिवशी मोठ्या प्रमाणावर भटक्या गोवंशाचा झुंडच असतो. अशावेळी अपघात होण्याचे प्रकार होत आहेत. त्यात गुरे जखमी होणे अशा घटना होतात. त्यामुळे दिवसेंदिवस वाढणारी ही समस्या बरीच चिंताजनक बनली आहे. एवढा मोठ्या प्रमाणावर भटकी गुरे येतात तरी कुठून हाच प्रश्न पडला आहे. संबंधित गोवंशाचे मालक तरी कुठे असतात. हा ही प्रश्न बनला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com