वरचा वाडामधील पथदिवे कुचकामी

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

येथील पंचायत क्षेत्रातील प्रभाग नऊ मधील वरचा वाडा क्षेत्रांत पथदीप सुविधा कुचकामी ठरली असून वीज खात्याने त्वरित दुरुस्त करण्याची मागणी पंच सदस्य मनोहर केरकर यांनी केली आहे.

हरमल :  येथील पंचायत क्षेत्रातील प्रभाग नऊ मधील वरचा वाडा क्षेत्रांत पथदीप सुविधा कुचकामी ठरली असून वीज खात्याने त्वरित दुरुस्त करण्याची मागणी पंच सदस्य मनोहर केरकर यांनी केली आहे.

दरम्यान ह्या पंचायत क्षेत्रातील प्रमुख मार्गातील व आवश्यक ठिकाणचे पथदीप अंधारात चाचपडत असल्याने नागरिक तसेच वाहन चालकांची भंबेरी उडत असल्याची प्रतिक्रिया नागरिक पीटर राॅड्रिगीस यांनी दिली.
अलीकडेच पंचायत निधीतून चतुर्थीकाळात कित्येक ठिकाणी ट्युबस व फिकसेर्स बसविले होते.प्रभागाच्या अंतर्गत वाड्यात नागरिकाना अंधारात चाचपडत जावे लागते हे ध्यानी घेऊन कित्येक ठिकाणी स्वखर्चाने पथदिपाची सोय केली होती.मात्र सध्या विपरीत परिस्थिती असून स्वखर्चाने बसविलेले पथदीप कुचकामी झाल्याची माहिती खात्याच्या कर्मचाऱ्यांनी दिल्याने सध्या सर्वत्र अंधकार पसरल्याचे पंचसदस्य केरकर यांनी सांगितले.

वीज खात्याने उज्वल योजनेतून कमी प्रमाणात पथदीप बसविले असून त्यांची वॉरंटी असल्याने काही फ़िक्ससेर्स बदलण्याची मागणी पंच केरकर यांनी केली आहे.परंतु अन्यठिकाणी असलेले ट्युबस जे पंचायत निधीतून घातले होते त्याची दुरुस्ती व नवीन बसविण्याचे प्रयत्न होऊ शकत नसल्याने पंच केरकर यांनी नाराजी व्यक्त केली.पंचायतीस पथदिपावर जादा खर्च करण्याची मंजुरी नसल्याने पंचायत हतबल असल्याने नागरिक पंचाच्या नांवे शंख करीत असल्याचे त्यानी सांगितले.
तरी वीज खात्याने ह्या प्रभागातील ग्रामस्थांची समस्या जाणून घेऊन पथदीप सुविधा उपलब्ध करावी व नागरिकांचा दुवा घ्यावा अशी मागणी सर्व थरांतून केली जात आहे.

संबंधित बातम्या

Tags