Nilkanth Halarnkar: मासेमारी बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई; मंत्री नीळकंठ हळर्णकर यांचा इशारा

कोस्टल पोलिसांना दिले कारवाईचे आदेश
Ministar Nilkanth Halarnkar
Ministar Nilkanth Halarnkar Dainik Gomantak

Minister Nilkanth Halarnkar on Violation of Fishing Ban: गोव्यात समुद्रात 1 जूनपासून दोन महिन्यांसाठी मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. या बंदीचे कुणी उल्लंघन केल्यास संबंधितांवर कठोर कारवाईचे आदेश, मत्स्य विभागाचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी कोस्टल पोलिसांना दिले आहेत.

Ministar Nilkanth Halarnkar
Goa Liquor Traders: मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मद्य विक्रीबातच्या अधिसूचनेस गोवा लिकर्स ट्रेडर्स असोसिएशनचा विरोध

1 जून ते 31 जुलै या काळात संपूर्णतः मासेमारी बंद राहणार आहे. दरवर्षी या कालावधीत मासेमारी बंद ठेवली जाते. माशांचा विणीचा हंगाम याच काळात असतो. तसेच हा काळ मॉन्सूनच्या पावसाचा काळ असतो. त्यामुळे समुद्रात जाणे धोकादायक असते.

तथापि, काही वेळा काहीजणांकडून या मासेमारी बंदीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून आले आहे. नियमभंग करणाऱ्या अशा लोकांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहेत. कोस्टल पोलिसांना याबाबतचे आदेश मंत्री हळर्णकर यांनी दिले आहेत.

कोणत्याही परिस्थितीत दोन महिने मासेमारी बंदी पाळली गेलीच पाहिजे, एकूण सागरी परिसंस्था आणि मानवासाठीही ते गरजेचे आहे, असे सरकारचे मत आहे.

Ministar Nilkanth Halarnkar
Amit Patkar: मंत्री काब्राल यांना मतदारसंघाची काळजी घेता येईना; पहिल्याच पावसात कुडचडेची दैना!

दरम्यान, गुरूवारीच काही मच्छिमारांनी जुलैच्या अखेरीस सौर कोळंबी पकडण्यासाठी समुद्रात जाऊ देण्याची मागणी सरकारकडे केली होती. जुलैच्या अखेरच्या काळात सौर कोळंबी मोठ्या प्रमाणात समुद्रात आढळून येतात.

काही लोक बंदी झुगारून ही मासेमारी करतात. पण बंदीचे पालन करणाऱ्यांवर त्यामुळे अन्याय होतो, अशी भावना मच्छिमारांनी व्यक्त केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com