विचार करूनच घराबाहेर पाऊल टाका; पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीणा यांचा गोयेंकरांना इशारा

गोमंन्तक वृत्तसेवा
रविवार, 9 मे 2021

पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीणा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील विविध तरतुदींचा उद्यापासून पोलिस दल वापर करणार आहे. सरकारने जारी केलेल्या आदेशात विनाकारण कोणी फिरू नये असे अपेक्षित आहे. काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही तसे स्पष्ट केले आहे.

पणजी: पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीणा(Director General of Police Mukesh Kumar Meena) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील विविध तरतुदींचा आजपासून पोलिस दल वापर करणार आहे. सरकारने(Goa) जारी केलेल्या आदेशात विनाकारण कोणी फिरू नये असे अपेक्षित आहे. काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत(Pramod Sawant) यांनीही तसे स्पष्ट केले आहे. कोविड महामारी रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणांवरील गर्दी कमी केली पाहिजे. केवळ कामासाठी घराबाहेर पडणारे सोडले तर इतरांनी घरातच थांबणे अपेक्षित आहे. उद्यापासून अशा विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिस कठोर कारवाई करतील. सरकारने जारी केलेल्या आदेशात आपत्ती व्यवस्थापनाच्या 51 व 60 कलमांतर्गत कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी. पोलिस या कलमांचा पुरेपूर वापर आजपासून करणार आहेत. त्यामुळे आपले घराबाहेर पडणे अत्यावश्यक आहे का, याचा विचार दहावेळा तरी करूनच घराबाहेर पाऊल टाकले पाहिजे.(Strict action of Goa police against those who leave their homes without any reason)

चार महिन्यांत दाबोळी विमानतळावर 2 कोटी 31 लाख रुपयांचे सोने जप्त

पोलिस अधीक्षक महेश गावकर यांनी यावेळी कलमांचा अर्थ सांगितला. त्यांनी सांगितले, या कायद्याच्या कलम 50 नुसार नागरिकांनी सुचनांचे पालन केले नाही तर एक वर्ष कैद किंवा दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते. महामारीच्या काळात खोटे आश्वासन दिल्यास दोन वर्षे कैदेची शिक्षा आहे. कलम 52 नुसार यासाठी कारवाई करता येते. मदतीसाठी गोळा केलेल्या पैशांचा, वस्तूंचा योग्य विनियोग न केल्यास कलम 53 नुसार कारवाई होणार आहे. खोटे इशारे देणाऱ्यांविरोधात कलम 54 नुसार कारवाई केली जाणार आहे. या गुन्ह्यासाठी 1 वर्षे कैदेची शिक्षा आहे. सरकारी कर्मचाऱ्याने या काळात काम करण्यास नकार दिल्यास कलम 56 नुसार कारवाई करता येते.

Goa Corona: राज्यात काल 3025 कोविडग्रस्त ठणठणीत बरे 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सा्ंगितले, की संचारबंदी हा शब्द प्रत्यक्षातील आदेशात नसला तरी आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील आणि फौजदारी प्रक्रिया संहितेची विविध कलमे पोलिस वापरतील. त्यामुळे पोलिसाची आजपासून रस्त्यावर उपस्थिती जाणवेल. कामावर जा-ये करणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही. कारण कोविड व्यवस्थापनाइतकेच अर्थचक्र सुरू राहणेही महत्त्वाचे आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिस कारवाई करतील. पोलिसांच्या या कारवाईआड कोणीही येऊ नये, असे सांगण्यात आले आहे.

लोक ऐकत नाहीत म्हणूनच...
विनाकारण फिरू नका, मासळी मार्केटमध्ये गर्दी करू नका असे आवाहन करूनही लोक ऐकत नव्हते. त्यामुळे आता पोलिसांकरवी नाईलाजाने का होईना सक्तीने अंमलबजावणी करावी लागत आहे. सार्वजनिक ठिकाणचा लोकांचा वावर कमी केल्याशिवाय कोविड संसर्ग प्रसार रोखणे अशक्य आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई झाली की 144 कलमाचा वापर कसा असतो याचा अनुभव अनेकांना येणार आहे. सरकार जनतेच्या विरोधात नाही परंतु जनतेसाठीच काही कठोर निर्णय घ्यावे लागतात ते घेतले आहेत. मासळी बाजारावर बंदी त्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळेच घालावी लागली आहे.

संबंधित बातम्या