Goa Tourism: पर्यटकांची सतावणूक व लुबाडणाऱ्यांविरोधात तीव्र कारवाई करणार; रोहन खंवटे

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची माहिती
Rohan Khaunte
Rohan KhaunteDainik Gomantak 

पणजी: पर्यटनाच्या नावाखाली समुद्रकिनाऱ्यावरील बेकायदेशीर कारवाया कायमच्या बंद करण्यासाठी पर्यटन खात्यातर्फे ठोस पावले उचलण्यात आली आहेत. समुद्रकिनारी पर्यटकांची सताणूक करणारे फेरीवाले, मसाज करणारे तसेच बेकायदेशीर गाईड्सच्या टोळ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. राज्याची प्रतिमा बिघडवणारे पर्यटन नको आहे. त्यामुळे पर्यटन खाते परीस व इतर देशांमधील रोड शो मध्ये सहभागी झाले नाही.

(Strict action will be taken against those harassing and robbing tourists says rohan khauante)

Rohan Khaunte
Goa News: गोविंद गावडे यांची फोंडा मामलेदार कार्यालयाला अचानक भेट

जेटी धोरण हे पर्यटनाशी संबंधित असेल. त्याचा वापर इतर कामासाठी केला जाणार नाही. हे पर्यटन जेटी धोरण असेल असे स्पष्टीकरण पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी आज केले. सरकारने राज्यात जेटी धोरण मसुदा लोकांकडून सूचना व हरकतींसाठी खुला केल्यापासून त्याला जोरदार विरोध होत आहे. हल्लीच झालेल्या ग्रामसभेतही या जेटी धोरणाच्या मुद्यावरून ग्रामस्थांनी विरोध केला आहे.

ग्रामीण भागात हे जेटी धोरण राबविले जाऊ नये यासंदर्भातचा ठराव घेतला आहे. यावर बोलताना पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले की, ग्रामसभेतील निर्णय काय झाले आहेत याची मला माहिती नाही. जेटी धोरणावर सूचना व हरकती मांडण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे. लोकांना 45 दिवसांची मुदत ठेवण्यात आलेली आहे.

Rohan Khaunte
Goa Tourism: गोव्यात मौजमजा करण्याच्या नादात या 6 चुका पडू शकतात भारी

लोकांना त्यांची मते मांडण्यासाठी तीन भाषांचा पर्याय ठेवण्यात आला आहे. या काळात लोकांनी मांडलेल्या मतांवर चर्चा केली जाईल. या जेटी धोरणामुळे कोळसा वाहतुकीसाठी त्याचा वापर तसेच रापणकारांच्या व्यवसायावर परिणाम होईल असे चुकीचे संकेत काहीजणंकडून लोकांच्या मनावर बिंबवले जात आहेत. त्यामध्ये काही विरोधकही या जेटी धोरणाचा कोणताही अभ्यास न करता लोकांना चिथावत आहेत.

काही व्यक्ती स्वतःला राजकारणाच्या प्रकाशझोतात येण्यासाठी व लोकांचे नेते होण्यासाठी असे प्रकार भडकावत आहेत. समुद्रकिनारी जलक्रीडा धोरणही तयार करण्यात येत असून ते डिसेंबरपर्यंत त्याचे काम पूर्ण होईल. उच्च न्यायालयानेही त्यासंदर्भात दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात येणार असल्याचे खंवटे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com