बेकायदेशीर गोष्टींवर होणार कठोर कारवाई

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

गुंडागिरीचा बिमोड करून बेकायदेशीर गोष्टींना पेडणे तालुक्यांत मुळीच थारा दिला जाणार नसल्याचे पेडणेचे पोलिस निरीक्षक जिवबा दळवी यांनी स्पष्ट केले. 

 तेरेखोल गुंडागिरीचा बिमोड करून बेकायदेशीर गोष्टींना पेडणे तालुक्यांत मुळीच थारा दिला जाणार नसल्याचे पेडणेचे पोलिस निरीक्षक जिवबा दळवी यांनी स्पष्ट केले. 

एक कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी आपल्या जबाबदारीचे भान ठेऊन काम करीत आहेत आणि पोलिस स्थानकाचा ताबा घेताच आपल्या कर्तव्यात कसूर न करता बेकायदेशीर गोष्टींवर अंकुश आणणारी कामगिरी करीत असल्याने पत्रकार लक्ष्मण ओटवणेकर व समाज कार्यकर्ते नामदेव तुळसकर व रामचंद्र पालयेकर यांनी निरीक्षक श्री. दळवी यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन त्यांच्या कर्तव्यदक्ष कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी पेडणे व मांद्रे मतदारसंघांतील विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पोलिस निरीक्षक श्री. दळवी म्हणाले, की गुंडागिरी, चोरी, बलात्कार, फसवेगिरीची आपल्याला मुळातच चीड आहे. त्यासाठी या प्रकारांना थारा दिला जाणार नाहीच. शिवाय तालुक्यात बेकायदेशीर गोष्टींना मुळीच अभय दिले जाणार नाही. अन्यायाविरोधात लढा देणे मी माझे कर्तव्य मानताना आपल्या कार्यशैलीत आपण वेळेचे बंधन पाळतो.

संबंधित बातम्या