गोवा हद्दीत कोविड चाचणी प्रमाणपत्र सक्तीचे

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 13 मे 2021

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार  गोव्याच्या हद्दीत प्रवेश करताना कोविड चाचणी निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीच्या आदेशाच्या अंमलबजावणीस गोवा पोलिसांनी पत्रादेवी तपासणी नाक्यावर  प्रारंभ केला आहे.

पेडणे: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोव्याच्या हद्दीत(Goa border) प्रवेश करताना कोविड चाचणी निगेटिव्ह प्रमाणपत्र(Covid test negative certificate) सक्तीच्या आदेशाच्या अंमलबजावणीस गोवा पोलिसांनी पत्रादेवी(Patradevi) तपासणी नाक्यावर  प्रारंभ केला आहे. गोवा हद्दीत प्रवेश करणाऱ्या व्यक्तीने 72 तासांपूर्वी कोरोना निगेटिव्ह चाचणीचे प्रमाणपत्र सादर करणे सक्तीचे आहे. राज्यात कोरोना महामारीने व मृत्यूने थैमान घातले असताना सरकारने तपासणी नाके खुले ठेवण्याच्या भूमिकेवर गोवा खंडपीठाने(Goa court) सरकारवर कडक ताशेरे ओढले होते.

Goa Oxygen Crisis: गोव्याला मिळणार रोज एक ऑक्सिजन टँकर 

मात्र सिंधुदुर्गातून गोव्यात दररोज कामासाठी येणाऱ्याना कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्राची गरज नसून कामाचा आयडी पुरावा सोबत ठेवणे आवश्यक असल्याची माहिती, उत्तर गोवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने दिली आहे. गोव्यात 10 मेपासून पर्यटकांना राहण्यास मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्तीस, गोवा हद्दीत  प्रवेश करू इच्छिणाऱ्या व्यक्तीस ७२ तासांच्या आत संपूर्ण लसीकरण केलेले प्रमाणपत्र किंवा कोविड निगेटिव्ह चाचणी अहवाल सादर करावा लागेल.

COVID-19 GOA: पहाटेच्या वेळी रुग्ण मृत्यूचे प्रमाण जास्त असण्याचे कारण काय? 

परंतु गोव्यात दररोज कामासाठी येणाऱ्याना यातून सूट देण्यात आली आहे. दररोज कामासाठी गोव्यात प्रवेश घेणाऱ्या व्यक्तीने कामाचा आयडी पुरावा सोबत ठेवणे आवश्यक आहे. सदर आदेशाचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या