Goa Traffic Police: वाहतूक पोलिसांकडून डिचोलीत कडक मोहीम

नियमबाह्य वाहनचालकांविरोधात कारवाईचा बडगा
Goa Traffic Police
Goa Traffic PoliceDainik Gomantak

Traffic Police in Bicholim Goa: राज्यात अपघातांचे सत्र सुरू असल्याने डिचोलीतही वाहतूक पोलिस विभाग गेल्या काही दिवसांपासून अधिक सक्रिय झाला आहे.

हेल्मेट परिधान न करणे, वेगमर्यादा आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात वाहतूक पोलिसांतर्फे कडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरोधात गुन्हेही दाखल करण्यात येत आहेत.

वाहतूक पोलिस विभागाचे निरीक्षक गौरीश मळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय आणि एएसआय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम चालू आहे.

दरम्यान, मंगळवारी (ता.१४) वाहतूक पोलिसांनी मोहीम गतिमान करताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक वाहनचालकांविरोधात दंडात्मक कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे.

वेगमर्यादेची तपासणी

डिचोली-अस्नोडा मार्गावरील व्हाळशी येथील आयटीआय परिसर हा अपघात प्रवण क्षेत्र आहे. या क्षेत्रात वाहनांच्या वेगमर्यादेवर नियंत्रण आणण्यासाठी त्याठिकाणी कॅमेरा बसवून वाहतूक पोलिसांतर्फे वाहनांची वेगमर्यादा तपासण्यात येत आहे. वेगमर्यादा आणि नियम मोडणाऱ्या वाहनचालकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com