वाळपईत चतुर्थीत सरकारी निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे : दशरथ गावस

प्रतिनिधी
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020

वाळपई नगरपालिका क्षेत्रात सर्व दहा प्रभागात लोकांनी चतुर्थी काळात सरकारने दिलेल्या सूचनांचे, निर्देशांचे चोखपणे पालन केले पाहिजे.

 वाळपई: वाळपई नगरपालिका क्षेत्रात सर्व दहा प्रभागात लोकांनी चतुर्थी काळात सरकारने दिलेल्या सूचनांचे, निर्देशांचे चोखपणे पालन केले पाहिजे. वाळपई बाजारात सामान खरेदी करताना सामाजिक अंतर राखून दुकानात थांबले पाहिजे. दुकानात गर्दी होणार नाही यासाठी दुकानमालकांनी कोरोनाच्या महामारीत खबरदारी घेतली पाहिजे. जर दुकानमालकांनी ग्राहकांसाठी गर्दी करण्याचा प्रयत्न केल्यास  दुकानाचा परवाना रद्द केला जाणार आहे. 

सामाजिक सुरक्षिततेची दक्षता बाळगली नाही तर कडक कारवाई केली जाईल असा इशारा सत्तरी तालुक्याचे मामलेदार दशरथ गावस यांनी दिला आहे. वाळपई नगरपालिका कार्यालयात आज. यावेळी वाळपई सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे स्थायी समितीचे अध्यक्ष तथा माजी उपसभापती श्री. नरहरी हळदणकर, नगराध्यक्ष अख्तर शहा, उपनगराध्यक्ष परवीन खान, नगरसेवक अनिल काटकर, रामदास शिरोडकर, रशिकांत च्यारी, अतुल दातये, परवीन शेख, सय्यद सरफराज, अंजली च्यारी, शहजीन शेख, पालिकेच्या कर्मचारी मधूरा नाटेकर, एकांऊंटन  मनिष्का कळंगुटकर, पोलीस हवालदार गोविंद गावस, पोलीस प्रशिक्षण केंद्राचे दीपक गावकर व चंद्रकांत गावस, वीज कार्यालयाचे अभियंता विवेक सावंत, खास निमंत्रित पत्रकार पद्माकर केळकर, उदय सावंत, दिनेश कर्पे, देविदास गावकर, निलेश परवार, कल्पेश गावस यांची उपस्थिती होती. दशरथ गावस म्हणाले अधिकाधिक लोकांनी यंदा दीड दिवसाचा गणपती विसर्जन करण्याचे ठरविले आहे. पाच, सात दिवसही ठेवू शकतो. पण सायंकाळी विसर्जनास्थळी लोकांची गर्दी होणार नाही ही काळजी घेतली पाहिजे. रात्री दहा पर्यंत विसर्जनाचा विधी पूर्ण करणे बंधन कारक आहे. वैयक्तिक घरचा गणपती विसर्जीत करण्यासाठी नेताना दोन तीन जणच गेले पाहिजे. प्रत्येक ठिकाणी पोलीस पथक नेमले जाणार आहे. तसेच वीज खात्याने रस्त्यावर, विसर्जनाच्या वाटेवर वीजेची सोय करावी असे निर्देश गावस यांनी दिले आहेत. बैठकीत सर्व नगरसेवकांनी आपल्या प्रभागात काळजी घेतली जाईल असे सांगितले आहे. माजी आमदार नरहरी हळदणकर यांनीही विचार व्यक्त करुन वाळपई सार्वजनिक गणेश मंडळाने चतुर्थीसाठी कसे नियोजन केले आहे याची माहिती सांगितली. 

वाळपईत सोसायटींत ग्राहकांची मोठी गर्दी! 
वाळपई शहरात असलेल्या काही सोसायटी संस्थेत ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळत असल्याचे बैठक विषय चर्चेला आला. त्यावर मामलेदार दशरथ गावस यांनी अशा स्वयंसेवा दुकानांना निर्देश देऊन सामाजिक अंतराची पाळणूक होईल यासाठी आदेश दिले जाईल असे गावस यांनी स्पष्ट केले.
 

संबंधित बातम्या