गोव्यात ''लसीकरण उत्सवाला'' जोरदार प्रतिसाद

गोव्यात ''लसीकरण उत्सवाला'' जोरदार प्रतिसाद
vishwjit rane

पणजी: राज्यातील पंचायत क्षेत्रातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर आयोजित ‘टिका उत्सव’ अभियानाअंतर्गत गोव्यात २० एप्रिलपर्यंत लसीकरण होणार आहे. आरोग्य खात्याने आज या लसीकरणाचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला आहे. खालील पंचायत क्षेत्रात सकाळी ९ ते संध्याकाळी ४.३० या वेळेत ४५ वर्षांवरील नागरिकांना हे लसीकरण मोफत होणार आहे. नागरिकांनी आपले आधारकार्ड सोबत घेऊन येणे गरजेचे आहे. या पंचायतीसह राज्यातील सर्व इस्पितळात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरूच राहणार आहे. त्यामुळे शहरी भागातील नागरिकांनी जवळच्या इस्पितळात जाऊन लस घ्यावी असे कळवण्यात आले आहे. (Strong response to vaccination festival in Goa)


‘टिका उत्सव’ अंतर्गत कोरोना प्रतिबंधक लस टोचण्याचा ४८ स्थानांवरील सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे 

12 एप्रिल - प्राथमिक आरोग्य केंद्र केळबायवाडा मये (मये व शिरगाव पंचायतीसाठी), दादा वैद्य हायस्कूल कुर्टी फोंडा, पंचायत सभागृह उगे, पंचायत सभागृह मोरपिर्ला, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सभागृह हरमल, साईबाबा मंदिर सांगोल्डा व विद्याप्रबोधिनी विद्यालय पोंबुर्पा.
13 एप्रिल - पंचायत सभागृह असोल्डा कुडचडे, सरकारी माध्यमिक शाळा भाटी व पंचायत सभागृह साळगाव.
14 एप्रिल - मोयरा क्लब सभागृह मयडे, नागवा चर्च सभागृह हडफडे नागोवा, सरकारी प्राथमिक शाळा मयते अस्नोडा, सरकारी प्राथमिक शाळा शिरोडवाडी मुळगाव, ताळगाव कम्युनिटी सभागृह ताळगाव, दयानंद हायस्कूल चोडण, एमआयबीके हायस्कूल खांडेपार, पंचायत सभागृह पंचवाडी शिरोडा, सार्वजनिक गणेशोत्सव मंडप बाजार शिरोडा, पंचायत सभागृह नेत्रावळी सांगे, सरकारी प्राथमिक शाळा झुआरीनगर, सरकारी प्राथमिक शाळा आंबावली केपे, शांतादुर्गा फातर्पेकरीण संस्थान सभागृह फातर्फा, पंचायत सभागृह खोला व पंचायत सभागृह शेल्डे. 
15 एप्रिल - पंचायत सभागृह गिरी, सरकारी हायस्कूल वाडे कुर्डी, पंचायत सभागृह कुळे, पंचायत सभागृह कुठ्ठाळी व पंचायत सभागृह बेतुल.
16 एप्रिल - रिक्रियेशन सभागृह कानसा थिवी, पंचायत सभागृह बस्तोडा, ताळगाव कम्युनिटी सभागृह ताळगाव, पंचायत सभागृह वेरे वाघुर्मे, सरकारी  प्राथमिक शाळा रिवण, पंचायत सभागृह दाबाळ, स्वामी विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालय बोरी, चर्च सभागृह केळशी, सरकारी हायस्कूल रुमडामळ व पंचायत सभागृह बार्से.
17 एप्रिल - सरकारी प्राथमिक शाळा टीटावाडो नेरुल,  ओल्ड एज होम इमारत चिंबल, आयडीयल हायस्कूल पिळगाव, सरकारी प्राथमिक शाळा कावरेपिर्ला, पंचायत सभागृह साकोर्डा, पंचायत सभागृह बेतोडा निरंकाल, पंचायत सभागृह कासावली, सरकारी हायस्कूल दवर्ली व शांतादुर्गा बाळ्ळीकरीन देवस्थान बाळ्ळी.
18 एप्रिल - सुनंदाबाई बांदोडकर हायस्कूल सालय साल्वादोर द मुंद, पेरीश सेंटर सभागृह हळदोणे, अवर लेडी ऑफ सांतक्रुझ हायस्कूल सांताक्रुझ, प्राथमिक आरोग्य केंद्र केळबायवाडा मये, पंचायत सभागृह मळकर्णे,  आयटीआय आके बायश व पंचायत सभागृह अवेडे. 
19 एप्रिल - पंचायत सभागृह वेळसांव. 
20 एप्रिल - सातेरी मंदिर सभागृह उसकई हळदोणे व पंचायत सभागृह मोले.

टिका उत्सवांतर्गत' 20 एप्रिल पर्यंत लसीकरण
राज्यात आज रविवारी सुमारे १६ पंचायतींच्या ठिकाणी आयोजित ‘टिका उत्सवा’स प्रचंड प्रतिसाद लाभला. सर्व आरोग्य केंद्र, सरकारी आणि खासगी इस्पितळ आणि पंचायतींमध्ये आयोजित कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा सुमारे ८१८९  नागरिकांनी लाभ घेतला. गोमंतकीयांनी या मोहिमेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनास अनुसरून राज्य सरकारने कालपासून ‘टिका उत्सव’ या मोहिमेअंतर्गत राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित केलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेस नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी रविवारी दुपारी सांताक्रुझ मतदारसंघातील मेरशी येथे सुरू असलेल्या लसीकरण केंद्रास भेट दिली आणि लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला. यावेळी स्थानिक आमदार टोनी फर्नांडिस, पक्षाचे राज्य प्रदेशाध्यक्ष अनिल होबळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना  सदानंद शेट तानावडे म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवहनानुसार राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी पुढाकार घेऊन उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री आणि सत्ताधारी तसेच विरोधी आमदारांना आणि इतर लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेऊन ‘टिका उत्सवा’चे आयोजन केले. लस घेण्यास पात्र असलेल्या आणि वयाची पंचेचाळीशी पार केलेल्या प्रत्येक नागरिकाने लसीकरण करून घ्यावे.

ते पुढे म्हणाले, की आतापर्यंत राज्यातील अंदाजे १ लाख ३५ हजारपेक्षा अधिक लोकांनी पहिली लस घेतली आहे. सुमारे ३० हजारपेक्षा जास्त लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि आरोग्यमंत्री राणे यांच्या पुढाकाराने राज्यातील जिल्हा इस्पितळ, उपजिल्हा इस्पितळ आणि सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू करण्यात आले आहे. इतर राज्यांच्या तुलनेत आपल्या राज्यातील लसीकरणाची संख्या चांगली असली तरी अधिकाधिक लोकांपर्यंत कोरोनाची लस पोहोचावी यासाठी केंद्राच्या सहकार्याने राज्य सरकारने आता लोकांपर्यंत लस नेण्याचे नियोजन केले आहे, असे तानावडे यांनी सांगितले.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com