ऑनलाईन अभ्यासासाठी मोबाईल न मिळाल्याने शाळकरी मुलाची आत्महत्या

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

गेल्या काही दिवसांपासून मुलगा पालकांकडे दहावीच्या अभ्यासासाठी मोबाईलची मागणी करत होता. मुलाच्या आईवडिलांची आर्थिक स्थिती बेताची असल्याने ते त्याला मोबाईल देऊ शकत नव्हते. मोबाईल न मिळाल्याने दहावीचा अभ्यास होऊ शकत नसल्याने मुलगा उदास होता व वैफल्यग्रस्त झाला होता.

पणजी- दहावीच्या ऑनलाईन अभ्यासासाठी पालकांनी मोबाईल देण्यास नकार दिल्याने पाळी-सत्तरी येथील रोहित भागो वारक या मुलाने घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी घडली.

कोविड महामारीमुळे राज्यातील शाळा बंद असल्याने काही शाळांमधून शिक्षक ऑनलाईन अभ्यासक्रम शिकवत आहे. त्यासाठी इंटरनेट असलेल्या अँड्रॉईड मोबाईलची आवश्‍यकता आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसल्याने त्यांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मोबाईल नसल्याने अभ्यास करणे शक्य नसल्याने एका मुलाने नैराश्‍येतून जीवन संपविले. 

गेल्या काही दिवसांपासून मुलगा पालकांकडे दहावीच्या अभ्यासासाठी मोबाईलची मागणी करत होता. मुलाच्या आईवडिलांची आर्थिक स्थिती बेताची असल्याने ते त्याला मोबाईल देऊ शकत नव्हते. मोबाईल न मिळाल्याने दहावीचा अभ्यास होऊ शकत नसल्याने मुलगा उदास होता व वैफल्यग्रस्त झाला होता. अभ्यासात आपण इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे पडणार असल्याची भीती त्याच्या मनात एकसारखी सलत होती. त्यामुळे त्याने अखेर आज आत्महत्या करत जीवन संपविले. हा मुलगा डोंगुर्ली - ठाणे (सत्तरी) येथील सरकारी शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होता. या प्रकरणाचा तपास वाळपई पोलिस करत असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉ इस्पितळाच्या शवागारात पाठविण्यात आला आहे.

संबंधित बातम्या