हरमल पंचक्रोशी हायस्कूलात विद्यार्थी गौरव सोहळा

प्रतिनिधी
रविवार, 13 सप्टेंबर 2020

विद्यार्थी जीवनात अत्युच्च यश महत्वाचे मानले जाते.विद्यार्थ्यांनी यशाबरोबर नम्रपणा व शालीन स्वभावातून सामाजिक भान व ऋण जपणे तितकेच गरजेचे असून, उच्च ध्येय व महत्वाकांक्षी गुण अंगी बाळगण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रा लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी व्यक्त केले. 

हरमल: विद्यार्थी जीवनात अत्युच्च यश महत्वाचे मानले जाते.विद्यार्थ्यांनी यशाबरोबर नम्रपणा व शालीन स्वभावातून सामाजिक भान व ऋण जपणे तितकेच गरजेचे असून, उच्च ध्येय व महत्वाकांक्षी गुण अंगी बाळगण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रा लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी व्यक्त केले. 

हरमल पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या ज्ञानदा सभागृहात दहावीच्या गुणवंत विद्यार्र्थ्यांच्या गौरव सोहळ्यात ते बोलत होते.यंदा हायस्कुलचा  निकाल 100 टक्के लागल्याने विध्यार्थी,अध्यापक वर्ग व पालकांचे खास कौतुक व अभिनंदन करण्यात आले.ह्या गौरव सोहळ्यात पाल्यांबरोबर पालकांना सुद्धा कौतूकांची थाप द्यावी हा संस्थेचा उदेश सफल झाला.विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशात पालकांचा वाटा व पाल्यांच्या यशामुळे आपले जीवन कृतार्थ झाल्याचा अनुभव पालकांना लाभावा अशी कामगिरी विद्यार्थ्यांनी केली आहे. पुढील जीवनात विद्यार्थ्यांनी आपली वर्तणूक चांगली ठेऊन पालकांची मान ताठ व अभिमान वाटावी असे कार्य करीत राहावे असे आवाहन चेअरमन पार्सेकर यांनी केले.

मानवास विचार करण्याची व बुद्धीद्वारे विकास करण्याची कुवत उपजत दिली आहे.त्याशिवाय  नम्रपणा,शालीनता,भाषाशैली व सामाजिक ऋण व गुरुजनांचा आदर व निष्ठा यांचे प्रतिबिंब विध्यार्थ्यांच्या अंगी निर्माण होणे आवश्यक आहे.सद्यकाळात विध्यार्थ्यांना गवसणी घालण्यास विविध क्षेत्रे खुणावत आहेत.आवडीनुसार शिक्षण घेण्याच्या सुविधा घरालगत असून त्याचा उपयोग महत्वाकांक्षा असल्यासच पूर्ण होईल.पंचक्रोशी शिक्षण मंडळाने विध्यार्थ्यांच्या उपयुक्त शिक्षण सुविधा निर्माण केली आहे.शहरी भागातील विध्यार्थी ह्या शिक्षण संस्थेत प्रवेश घेत आहेत हे सुचिन्ह आहे.ह्यावेळी विध्यार्थ्यांना बोधपर कथा सांगून,''मी''पणा व इमले रचण्यापेक्षा प्रत्यक्षात समाजहित काम व कार्य करण्याचे आवाहन चेअरमन पार्सेकर यांनी विध्यार्थ्यांना उद्देशुन केले.

विध्यार्थ्यांच्या यशात विद्यालयाच्या टीम लीडर अर्थात मुख्यध्यापिका स्मिता पार्सेकर व शिक्षकवर्गाचे विशेष कौतुक न केल्यास सोहळ्याच्या बेरंग होऊ शकतो त्यासाठी त्यांचे खूपखूप कौतुक असल्याचे सांगितले.सध्या कोरोनाचा प्रभाव वाढत असून आम्हीं प्रत्येकाने यशस्वीपणे मुकाबला करण्यासाठी तत्पर राहावे.त्यासाठी मास्क,स्वच्छता राखणे,सामाजिक अंतराचे पालन तसेच गुणकारी काढा व गरम वाफ घेऊन स्वतः व घरातील मंडळींना आजारापासून दूर ठेऊ शकता व ठेवा,असे आवाहन चेअरमन पार्सेकर यांनी केले.

विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवताना केलेले कष्ट व एकाग्रता भावी जीवनात राबवावी व यश मिळवावे.कोरोना महामारीशी लढण्यासाठी आपण सदैव तयार राहावे त्यासाठी मास्क,स्वच्छता,सामजिक अंतर आदीचे पालन करण्याचे आवाहन पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष गडेकर यांनी केले.हायस्कुलच्या मुख्याध्यापिका स्मिता पार्सेकर यांनी प्रास्ताविक भाषणांतून विद्यार्थ्यांचे कौतुक व व्यवस्थापन मंडळाचे आभार व विध्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

यावेळी व्यासपीठावर मुख्यध्यपिका स्मिता पार्सेकर,पालक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष देऊ गडेकर,उपाध्यक्ष प्रमोद(हरेश) मयेकर,सदस्य प्रकाश विरनोडकर,जेष्ठय शिक्षक लक्ष्मण कुबल उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विध्यार्थ्यांचा गौरव केला.पाहुण्यांचे स्वागत शिक्षिका गायत्री शेटकर यांनी गुलाबपुष्प देऊन केले,सूत्रसंचालन शिक्षिका पूजा बांधकर तर जेष्ठय शिक्षक लक्ष्मण कुबल यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या